इमरान हाशमीच्या ‘या’ व्हिडिओला ५ कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल!

Imran Hashmi's 'Yaa' video gets more than 5 crore views, video goes viral on social media!
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई : अभिनेता इमरान हाशमी हा बॉलिवूडमधील एक अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्यानं आपल्या अनोख्या अभिनय शैलीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचा प्रत्येक चित्रपट हा काही सुपरहिट होत नाही पण त्याच्यावर फ्लॉप चित्रपटाचा शिक्काही बसत नाही. यावरुनच इमरानच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो. दरम्यान त्याचं एक नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. अन् आश्चर्याची बाब म्हणजे या गाण्यानं काही दिवसांतच तब्बल पाच कोटींपेक्षा अधिक व्ह्यूज मिळवले आहेत.
इमरानच्या या नव्या गाण्याचं नाव लुट गये (Lut Gaye) असं आहे. नुकतंच हे गाणं युट्यूबवर प्रदर्शित केलं गेलं. या गाण्यात अभिनेत्री युक्ती तऱ्हेजा हिनं इमरानच्या प्रेयसीची भूमिका साकारली आहे. दोघांचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडला आहे. हे गाणं सध्या वाऱ्यासारखं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या गाण्यानं केवळ ६० दिवसात युट्यूबवर तब्बल पाच कोटींपेक्षा अधिक व्ह्यूज मिळवले आहेत. इतके व्ह्यूज मिळवणारा हा भारतातील मोजक्या व्हिडीओंपैकी एक ठरला आहे.
टी सीरीजनं (T-Series) या गाण्याची निर्मिती केली आहे. हे गाणं झुबिन नौटियाल यांनी गायलं आहे. या गाण्याचे स्वर मनोज मुंताशीर यांनी लिहिले असून तनिष्क बागची यांनी गाण्याला संगीतबद्ध केलं आहे. ‘लूट गये’ अलीकडेच मोठ्या संख्येने व्हूज मिळवत सर्वांच्या आवडत्या गाण्यांपैकी एक बनले आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *