सिनेमातून प्रेमाची व्याख्या सांगणाऱ्या इम्तियाजने खऱ्या आयुष्यात लय चढ उतार पाहिलेत…

बॉलिवूडला ‘जब वी मेट’, ‘रॉकस्टार’ ‘हायवे’, ‘तमाशा’ यासारखे दमदार चित्रपट देणारा दिग्गज निर्माता-दिग्दर्शक आणि लेखक इम्तियाज अली आज आपला 51 वा वाढदिवस साजरा करीत आहे. त्याने आपल्या रोमँटिक चित्रपटातून प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे.
इम्तियाजच्या आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर तो थोडा फिल्मी आहे. अनेक जबरदस्त चित्रपट देणारे दिग्दर्शक इम्तियाज अली आज ओटीटीच्या जगात फार सक्रिय आहेत. इम्तियाजच्या वाढदिवसानिमित्य जाणून घेऊया दिग्दर्शक होण्यापूर्वीचे आणि नंतरचे आयुष्य…
इम्तियाज अलीचे बालपण
इम्तियाज अली यांचा जन्म 16 जून 1971 रोजी जमशेदपूर, झारखंड येथे झाला. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण पाटणा येथील सेंट झेवियर्समधून केले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी तो जमशेदपूर येथे आला. येथे इम्तियाज त्याच्या मावशीकडे राहत होता. घराजवळ एक थिएटर होते, तिथे तो अनेकदा चित्रपट पाहायला जात असे. इथूनच त्याला सिनेमामध्ये रुची निर्माण झाली.
त्यांनी स्वतः जमशेदपूरमध्ये थिएटर करायला सुरुवात केली आणि उरलेल्या वेळेत पटकथा लिहायला सुरुवात केली. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी तो दिल्लीला गेला आणि दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतले. येथे त्यांनी थिएटरमध्येही भाग घेतला. यानंतर आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो मायानगरी मुंबईला आला. मुंबईत राहून इम्तियाजने झेवियर्स इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशनमध्ये डिप्लोमा कोर्स केला.
टीव्हीच्या दुनियेत दिग्दर्शकीय पदार्पण
इम्तियाज अलीने टीव्हीद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले. त्यांनी ‘कुरुक्षेत्र’ आणि ‘महाभारत’ शो दिग्दर्शित केला. त्यानंतर तो चित्रपटांकडे वळला. 2005 साली त्यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट ‘सोचा ना था’ रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेता अभय देओल आणि अभिनेत्री आयेशा टाकिया मुख्य भूमिकेत दिसले होते.
एका संवादात इम्तियाजने सांगितले की, सोचा ना था चित्रपट बनवण्यासाठी त्याला चार वर्षे लागली. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमी करू शकला नाही. पण हा चित्रपट बनवताना त्यांनी चित्रपट निर्मितीच्या अनेक बारकावे शिकून घेतले. यानंतर 2006 मध्ये आलेल्या इम्तियाजच्या ‘आहिस्ता आहिस्ता’ या पुढच्या चित्रपटालाही फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
पण 2007 मध्ये आलेल्या ‘जब वी मेटने’ इम्तियाज अलीचे नशीबच पालटले. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर या चित्रपटाने त्यांना एक यशस्वी दिग्दर्शक म्हणून ओळख मिळवून दिली, यानंतर इम्तियाज अलीने यशाचे शिखर गाठत ‘रॉकस्टार’, ‘हॅरी मेट सेजल’, ‘तमाशा’ आणि ‘लव्ह आज कल’ यासारखे अनेक हिट चित्रपट बॉलीवूडला दिले.
अभिनेता व्हायचे स्वप्न राहिले अर्धवट
इम्तियाज अलीला बॉलीवूड इंडस्ट्रीत अभिनेता व्हायचे होते परंतु त्याचे ते स्वप्न अपूर्णच राहिले. अनुराग कश्यपच्या ‘ब्लॅक फ्रायडे’ या चित्रपटात त्याने याकुब मेननची भूमिका साकारली असली तरी अभिनय त्याला जमे नाशे झाली, त्यामुळे त्याने दिग्दर्शनात परिश्रम घेऊन यश मिळवले.
अनेक यशस्वी चित्रपट दिल्यानंतर इम्तियाज अलीने विंडो सीट फिल्म्स नावाने स्वतःचे प्रोडक्शन हाऊस उघडले. या प्रोडक्शन हाऊसचा पहिला चित्रपट ‘हायवे’ होता, ज्यामध्ये आलिया भट्ट आणि रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत दिसला होता.
इम्तियाजचे वैयक्तिक आयुष्यातील चढ – उतार
इम्तियाजने ‘रॉकस्टार’ चित्रपटाद्वारे रोमान्स पडद्यावर अप्रतिमरित्या दाखवला असला तरी इम्तियाजचे वैयक्तिक आयुष्य त्याच्या चित्रपटांसारखे नव्हते, कारण इम्तियाज अलीने प्रीती अलीशी लग्न करून 10 वर्षांहून अधिक काळ झाला होता पण या जोडप्याने 2012 मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
इतकंच नाही तर इम्तियाज अली ऑस्ट्रेलियन शेफ सोबत डेटिंग करत असल्यामुळे चर्चेत आहे. मात्र, आतापर्यंत इम्तियाजने दोघांच्या नात्यावर मौन बाळगले आहे. माहितीनुसार, इम्तियाज ‘मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया सीझन 6’ ची स्पर्धक सारा टॉडच्या प्रेमात आहे. सारा एक ख्यातनाम शेफ असून रेस्टॉरंट आणि कूकबुक लेखक आहे. सारा आता भारतात स्थायिक झाली आहे. कारण ती आता उत्तर गोव्यात ऑस्ट्रेलियन – थीम असलेले रेस्टॉरंट चालवते.
अधिक वाचा :
‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ ते ‘ती सध्या काय करते’ असा होता आर्या आंबेकरचा प्रवास…