मी बॉक्स ऑफिस क्लॅशची काळजी करत नाही, ‘गांधी गोडसे: एक युद्ध’ चित्रपटाच्या दिगदर्शकाचे मोठे वक्तव्य

११ जानेवारी रोजी राजकुमार संतोषी यांचा दिगदर्शकीय पुनरागमन (डायरोक्टेरियल कमबॅक) ”गांधी गोडसे: एक युद्ध” चित्रपटाचा ट्रेलर लाँच प्रदर्शित करण्यात आला. गांधी की गोडसे हा भारतीय इतिहासासाठी सदैव विवादाचा मुद्दा ठरलेला आहे. या विषयाला घेऊन चित्रपटाच्या दृष्टिकोनाने विचार करणे हीच एक धाडसी कामगिरी आहे. या विषयाची निवड करून,विचार विनिमय केल्याशिवाय कुठलाच निर्माता किवां दिग्दर्शक चित्रपट उभा करू शकत नाही. या विषया बाबत स्वतःच मत आणि गांधी-गोडसेचे दृष्टिकोन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दिग्दर्शक राजकुमार संतोषीचे विशेष कौतुक करायला हवे.
”गांधी गोडसे: एक युद्ध” चित्रपटात वैभव मांडलेकर याने ‘नथुराम गोडसे’ ही व्यक्तिरेखा साकारली आहे, दीपक अंतानी हे ‘मोहनदास करमचंद गांधीच्या’ भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहेत. यासोबतच पवन चोप्रा हे ‘जवाहरलाल नेहरूंच्या’ भूमिकेत दिसणार आहेत. ‘गांधी गोडसे:एक युद्ध’ चित्रपटासोबत राजकुमार संतोषी यांची मुलगी ‘तनिषा संतोषी’ चित्रपटविश्वात पदार्पण करणार आहे.
चित्रपटात नथुराम गोडसे आणि महात्मा गांधी यांची काल्पनिक विश्वात, एकमेकांसोबत एक भेट दाखवलेली आहे. नथुराम गोडसेने झाडलेल्या गोळीने गांधीजींचा मृत्यू होत नाही आणि ते नथुराम गोडसेंची भेट घ्यायला तुरुंगात जात आहेत असे चित्रीकरण ह्या चित्रपटात केले आहेत. तुरुंगात गेल्यानंतरचा होणारा दोघांमधला वैचारिक द्वंदाला शब्दांचं स्वरूप देत दोघांतील वैचारिक युद्ध मोठ्या पडद्यावर दाखवण्याचा दिगदर्शकाने प्रयत्न केला आहे.
ट्रेलरबाबत बोलायचे झालेतर चित्रपटाचे चित्रीकरण उत्कृष्ट पद्धतीने साकारले गेले आहे. तसेच वैभव मांडलेकर यांचे, त्यांच्या संवादफेकी साठी प्रेक्षांकडून विशेष कौतुक केले जात आहे. दिग्दर्शकाने पात्रांच्या व्यक्तीकरणावर काम केल्याचे ट्रेलरमधून सबळपणे सबळपणे दिसून येत आहे. संवाद देखील प्रेक्षांकच्या मनावर ठसा बिंबवणारे आणि परिणामकारक आहेत.
‘गांधी गोडसे: एक युद्ध’ चित्रपटाचे संवाद स्वयं दिग्दर्शक,राजकुमार संतोषी यांनी लिहिलेले आहेत. हा चित्रपट ‘असगर वजाहतह्यांनी’ लिहिलेल्या एका नाटकावर आधारित आहे. ट्रेलर प्रदर्शित करणाऱ्या प्रेस कॉन्फरेन्समध्ये संतोषीनें पठाणसोबत होणाऱ्या “बॉक्स ऑफिस क्लेश” बद्दलत्यांचे मत व्यक्त केलं.
शाहरुख खानचा बहुचर्चित चित्रपट ‘पठाण’ २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे आणि गांधी गोडसे: एक युद्ध हा गणतंत्र दिवसाला म्हणजेच २६ जानेवारी रोजी प्रदर्शित होतं आहे. प्रेस कॉन्फरेन्समध्ये संभाषन साधताना संतोषीनी या मुद्द्यावर आपले मत मांडत, स्पष्टरूपाने मीडिया ला सांगितले की, मी बॉक्स ऑफिस क्लेशची पर्वा करत नाही. ”आमचा चित्रपट खूप वेगळा आहे, ज्यांना अशा चित्रपटांमध्ये रस आहे आणि असे चित्रपट आवडतील ते आमचा चित्रपट पाहतील.
आमचा हा गाण्या-नृत्याचा चित्रपट नाही, तर खूप वेगळा चित्रपट आहे. त्यामुळे मी अशा गोष्टींची (बॉक्स ऑफिस क्लॅश) काळजी करत नाही. दोन्ही चित्रपट अतिशय भिन्न स्वरूपाचे आहेत आणि प्रत्येक चित्रपट त्यांच्या योग्य ठिकाणी आहेत. समोर कोण आहे याची मला चिंता नाही, मी फक्त माझ्या चित्रपटावर लक्ष केंद्रित करत आहे.” असे वक्तव्य संतोषीयांचे होते. शाहरुख खानचे कोतुक करत राजकुमार संतोषी यांनी पठाणसाठी यश राज फिल्म्सला आणि शाहरुख खान आणि त्याचा संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.
यामुळे हे चित्र तर निश्चित रूपाने स्पष्ट होते कि ‘गांधी गोडसे: एक युद्ध’ ला घेऊन निर्मात्यांना विश्वास आहे. याचबरोबर ते कोणासोबतच स्पर्धेसाठी इच्छुक नाही आहेत. राजकुमार संतोषीने त्यांच्या चिंतेचा विषय देखील मीडियासमोर सांगितलेला होता, तो बॉक्स ऑफिस नसून प्रमाणन परिषदेचा होता. तिथून देखील दिग्दर्शक आणि निर्मात्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळालेला असून, परिषदने कुठल्या हि प्रकारची ‘कात्री’ दृश्यांना लावलेली नसल्याचं संतोषीने सांगितले.
चित्रपटाला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) कडून “यू” प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. या चित्रपटाने राजकुमार संतोषी ९ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधी नंतर मोठ्या दिग्दर्शकाच्या खुर्चीवर विराजमान झाले आहेत.
चित्रपटाच्या ट्रेलरने लोकांच्या मनाला हुरहूर लावत प्रेक्षक वर्गाला बांधून ठेवले आहे. चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघणाऱ्या प्रेक्षकांची उत्सुकता अधिक न ताणता ‘गांधी गोडसे: एक युद्ध’ २६ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.