प्लाझ्मा दान करण्याचे मला भाग्य मिळालं आहे – बच्चू कडू

I'm lucky to donate plasma - baby bitter
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

अमरावती : राज्यभरात कोरोना रुग्णांना वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यूचं प्रमाण वाढत आहे. तर प्लाझ्मा अभावी अनेक रुग्णांचा मृत्यूसुद्धा होतोय. कोरोना रुग्णांना गंभीर परिस्थितीत प्लाझ्माची गरज असते. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्यावतीने प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन करण्यात येतंय. अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख रुग्णालयात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्लाझ्मा दान केला आहे.
आम्ही रक्त काढणाऱ्यांपैकी नाही तर रक्त देणाऱ्यांपैकी आहोत असे बच्चू कडू म्हणालेत. कोरोनामुक्त झाल्यानंतर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्लाझ्मा दान केलंय. यानंतर ते बोलत होते. आतापर्यंत आमची रक्त देण्याचीच संकल्पना राहिली. सध्या कोरोनामुळे प्लाझ्मासाठी अनेकांना वाट पाहावी लागत आहे. आणि आता माझ्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत. त्यामुळे प्लाझ्मा दान करण्याचे मला भाग्य मिळालं आहे. खरंतर कुणाला याची गरज लागावी अशी वेळ येऊ नये. जर दुर्दैवाने ती वेळ आलीच तर त्यांना देण्याची आमची तयारी आणि सहभाग असला पाहिजे. जीव वाचवण्यासाठीचं लहानसं काम आम्ही केलं आहे. असे बच्चू कडू म्हणाले.
राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन वेळा कोरोनाची लागण झाली होती. त्यातून ते बरे झाल्यावर त्याच्या शरीरात अँटी बॉडीज तयार झाल्या. त्यामुळे त्यांनी प्लाझ्मा दान करत इतरांनी सुद्धा प्लाझ्मा देण्यासाठी पुढं यावं असं आवाहन त्यांनी केलं.
बच्चू कडू यांनी आतापर्यंत तब्बल १०० वेळा रक्तदान केलंय. आता १०१ व्या वेळी त्यांनी आपला प्लाझ्मा दान केला आहे. आतापर्यंत सर्वाधिक वेळा रक्तदान करणारे एकमेव लोकप्रतिनिधी बच्चू कडू असल्याचे सांगितलं जातंय.
ज्या रुग्णाला हा प्लाझ्मा मिळेल त्याचा जीव वाचेल अशी प्रार्थना करतो. आपली भूमिका ही नेहमी रक्त आणि प्लाझ्मा देणाऱ्यांपैकी असली पाहिजे. रस्त्यावर तलवार फिरवून एखाद्याला मारण्यापेक्षा रक्तदान करणाऱ्या युवकांची देशाला गरज आहे असेही राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *