अगर तुम होते, तो बात कुछ और होती …

पवित्र रिश्ता या प्रसिद्ध आणि लोकप्रिय हिंदी मालिकेतून ‘मानव’ या नावाने घराघरात पोहोचलेल्या सुशांत सिंग राजपूतचा आज वाढदिवस आहे. सुशांतने पवित्र रिश्ता नावाच्या हिंदी डेली सोपमधून आपला अभिनय प्रवास सुरू केला. सुशांतने स्वतः च्या मेहनतीवर वर्क यशस्वी अभिनेता म्हणून स्वतःची कारकिर्द्ध घडवली असली तरी त्याचा प्रवास सोपा नव्हता.
सुशांत सिंग राजपूतचा जन्म पाटणा, बिहार येथे झाला आणि 14 जून रोजी मुंबई येथे त्याचे निधन झाले. सुशांतच्या करिअरबद्दल सांगायचे तर, सुशांतने बॅकग्राउंड डान्सर म्हणून पहिले काम केले. ‘धूम’ चित्रपटात सुशांत हृतिक रोशन आणि ऐश्वर्या राय यांच्या मागे डान्स करताना दिसला होता. 2006 मध्ये
अभिनयाला गांभीर्याने घेऊन या क्षेत्रात काम करण्याचा विचार केला. अभियांत्रिकीच्या चौथ्या वर्षात असताना सुशांतने अभिनयासाठी कॉलेज सोडले. सुशांतने थिएटर ग्रुपमध्ये लक्ष घातले आणि याच क्षेत्रात करियर करायचे ठरवले.
सुशांतला त्याचा पहिला प्रोजेक्ट ‘किस देश में है मेरा दिल’ या मलिकाकडून मिळाला. ही मलिका सुशांतसाठी सर्वात खास ठरली. या डेली सोपच्या माध्यमातून ‘सुशांत’ हे नाव लोकांपर्यंत पोहोचले होते. हिंदी जगतातील प्रसिद्ध निर्माती ‘एकता कपूर’ने तिच्या ‘पवित्र रिश्ता’ या नवीन प्रोजेक्टसाठी सुशांत सिंगची निवड केली आणि तिथून सुशांतच्या अभिनेता म्हणून त्याच्या प्रवासाला वेग आला.
पवित्र रिश्तानंतर सुशांतने ‘जरा नचके दिखा’, ‘झलक दिखला जा’ यांसारख्या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला. प्रख्यात कास्टिंग डायरेक्टर ‘मुकेश छाबरा’ यांनी ‘काई पो चे’ या चित्रपटासाठी त्याची निवड केली. निवड झाल्यावर टेलिव्हिजनपर्यंतच्या मर्यादित असलेल्या त्याच्या प्रवासाला एक नवीन दिशा मिळाली. आणि त्याचे मोठ्या पडद्यावर आगमन झाले. २०१५ साली आलेला काई पो चे हा सुशांतचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात त्याच्यासोबत राजकुमार राव आणि अमित साध देखील होते.
त्यानंतर सुशांतला ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘पीके’, ‘राबता’, ‘डिटेक्टिव ब्योमकेश बक्षी’, ‘एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’ आणि ‘दिल बेचारा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका मिळत गेल्या. यातील काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कमाई केली, तर काही चित्रपटांनी लोकांच्या मनात घर केले. काही चित्रपटांनी त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली. ही त्याच्या उत्कृष्ट अभिनयाची पावती होती.
वैयक्तिक पातळीवर, त्याला फिजिक्स या विषयाची प्रचंड आवड होती त्यामुळे त्याने या क्षेत्रात पुढे जाण्याचा विचार केला होता. या सर्व विषयांच्या ज्ञानामुळे ते तरुणांमध्ये प्रसिद्ध झाले. त्यांचा सराव, जिज्ञासा आणि अवघड विषय वाचण्याची आवड यामुळे त्यांची व्यक्तिरेखा लोकांपर्यंत पोहोचली होती. 2017 मध्ये सुशांतने दोनदा फोर्ब्सच्या 100 लोकांच्या यादीत स्थान मिळवले. जागतिक सुपरमॉडेल केंडल जेनरसोबत काम करणारा तो पहिला आणि एकमेव भारतीय अभिनेता होता.
मात्र, 14 जून 2020 रोजी सुशांतच्या मृत्यूने दुर्दैवी अंत झाला. सुशांतने मुंबईत गळफास घेऊन आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेने सुशांतच्या चाहत्यांना धक्का बसला. मनोरंजनाच्या जगात एक उगवता तारा गमावला होता. सुशांतच्या मृत्यूने बॉलिवूडचा पाया काही प्रमाणात हादरला.
फिल्म इंडस्ट्रीत असलेल्या घराणेशाहीचा विषय इथून सुरू झाला. सुशांतच्या चाहत्यांनी #JusticeforSSR हा हॅशटॅग ट्रेंड केला होता, ज्यामध्ये अनेक प्रसिद्ध हिंदी अभिनेते आणि अभिनेत्री आल्या होत्या. या प्रकरणात एनसीबीचाही सहभाग होता. काळाच्या ओघात या प्रकरणाला अनेक वळणे लागली. त्याची आग परदेशात देखील पसरली,परदेशातील लोकांनी सुशांतला न्याय देण्याची मागणी केली होती.
मोठ्या अभिनेत्यांच्या मुलांना इंडस्ट्रीत आणण्यासाठी सुशांतसारख्या कोणताही गॉडफादर नसलेल्या अभिनेत्यांकडून संधी हिरावून घेण्यात आल्या आणि यातूनच त्याने आत्महत्तेसारखे टोकाचे पाऊल उचलले असा आरोप करण्यात आला. या आरोपांमुळे बॉलीवूड विरोधात नेटकऱ्यांनी #boycotbollywood हा ट्रेंड चालू केला होता. सुशांतच्या मृत्यूच्या तीन वर्षांनंतरही बॉलीवूड यातून अजून सावरलेले नाही.