Tuesday, October 4, 2022
Homeब-बातम्यांचालॉकडाऊन पासून देशाला वाचवायचे असेल तर नियम पाळावे- पंतप्रधान नरेंद्र मोदी

लॉकडाऊन पासून देशाला वाचवायचे असेल तर नियम पाळावे- पंतप्रधान नरेंद्र मोदी

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनतेशी संवाद साधत पुन्हा एकदा नियम पाळावे असे आवाहन केले आहे. यावेळी ते म्हणाले की, कोरोनाचे नियम पाळून जनतेने देशाला लॉकडाऊन पासून वाचवायला हव. राज्यांनीही लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय म्हणून पाहावे. कोरोनाच्या नियामचे पालन काटेकोर पणे करायला हवे. औषधासोबत कडक नियमांचे पालन हा मंत्र विसरून चालणार नाही. लस घेतल्यानंतरही हा नियम पाळायचा आहे. तरुणांनी जागृती हवी असे मत सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केले.

पंतप्रधान नरेद्र मोदी म्हणाले की, तुम्ही जे भोगताय त्याची मला जाणीव आहे. कोरोनाने जे गेले त्यांच्या बाबत मी संवेदना व्यक्त करतो. कोरोनाच्या लाटेमुळे देशासमोर आणखी एक संकट उभे राहिले आहे. ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. यावर संवेदनशीलपणे काम सुरु आहे. सगळ्यांना ऑक्सिजन पुरेल यासाठी उपाय करण्यात येत आहे. कोरोना वाढल्यानंतर फार्मा कंपन्यांनी आपले उत्पादन वाढविले आहे. अजूनही वाढविणार आहेत. कालच फार्मा कंपनीच्या मालकाशी बोललो आहे. गेल्या काही दिवसात उचलण्यात आलेले पाऊल मजबूत करू. भारताने जगातील सर्वात स्वस्त लास तयार केली. आता आपल्याकडे औषध, उपचार आणि कोविड सेंटर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

-सरकारी रुग्णालयात मोफत लस मिळणार  

-जगात सर्वाधिक वेगवान लसीकरण झाले.

  • आता पर्यंत १२ कोटी नागरिकांचे लसीकरण  

-आरोग्य सुविधा कामी पडू देणारं नाही

-बेड वाढविण्याचे काम सुरु

– श्रमिकांना लवकरात लवकर लसीकरण करण्याचा प्रयत्न  

– श्रमिक जिथे आहेत तिथेच रहावे. त्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावे

– टेस्टिंग वाढतोय

– मोठ्या माणसांनी विनाकारण बाहेर पडू नये

– देशाला लॉकडाऊन पासून वाचावयाचे आहे

 -शेवटचा पर्याय म्हणून लॉकडाऊन कडे पाहावे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments