‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला

पंकजा मुंडे
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

अंबाजोगाई – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपल्याला पैसा, जात-पात यांचा प्रभाव सोडून विचार करावा लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाच्या राजकारणातील वंशवाद संपवायचा आहे. मी देखील वंशवादी राजकारणाचे प्रतिक आहे ; मात्र, जनतेचे प्रेम मिळाले, तर मला कोणीही अगदी मोदीही संपवू शकत नाहीत, असे प्रतिपादन भाजपच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अंबाजोगाईतील बुद्धीजीवी संमेलनात बोलत होत्या.

पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यानंतर मोठा गदारोळ झाल्याचे पाहायला मिळत आहे. प्रसार माध्यमांनी संपूर्ण भाषणातील एकच ओळ लोकांपर्यंत पोहोचवल्याने वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याचा आरोप पंकजा मुंडे यांनी केला आहे.

अर्धवट विधान लोकांपर्यंत पोहोचवून पंकजा मुंडे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिले, असे चित्र काही प्रसार माध्यमांनी केल्याचा आरोपही पंकजा मुंडे समर्थकांनी केला आहे.

मात्र, वास्तवात पंकजा मुंडे यांनी भाषणात नरेंद्र मोदी यांचा आदरपूर्वक उल्लेख केला होता. मोदी यांनी केलेल्या संघर्षाचे, ध्येयपूर्तीसाठी असलेल्या त्यांच्या जिद्दीचे उदाहरणही मुंडे यांनी समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना दिले होते. परंतु त्यातील एकच वाक्य मागचेपुढचे संदर्भ न घेता व्हायरल करण्यात आले.

यामुळे संपूर्ण भाषणाचा मतितार्थ लक्षात न घेता त्यातील मोजकीच काही वाक्ये घेऊन पंकजा मुंडे यांना जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला आहे.

सोशल मिडीयावरील गदारोळानंतर पंकजा मुंडेंचे स्पष्टीकरण

माझ्या भाषणातील एक ओळ आपल्या पर्यंत आलीच आहे, “सनसनीखेज” बातम्यांतून जमले तर संपूर्ण भाषणही पहा, मतितार्थ लक्षात येईल’ असा टोला पंकजा मुंडे यांनी वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना लगावला आहे.

अधिक वाचा :

राऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *