धमक असेल तर चौकशी कराच
आजी- माजी उर्जामंत्र्यात जुंपली
नागपूर : फडणवीस सरकारच्या काळात उर्जा विभागाच्या तक्रारी असून त्या संदर्भात चौकशी करण्यासाठी लवकरच समिती नेमण्यात येईल, असे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी शुक्रवारी सांगितले होते. यावर तत्कालीन उर्जामंत्री यांनी उत्तर दिले असून धमक असेल तर चौकशी करून दाखवा असे उत्तर माजी उर्जा मंत्री चंदशेखर बावनकुळे यांनी नितीन राऊत यांना दिले.
काय म्हणाले होते नितीन राऊत, उर्जा विभागाच्या कंपन्यामध्ये मनमानी व नियमबाह्य निर्णय झाल्याचे समोर आले आहे. तज्ञाची समिती नेमून त्याची चौकशी करण्यात येईल. तत्कालीन उर्जा मंत्री यांनी घेतलेले निर्णय, त्यांच्या सल्लागारांचा काय रोल आहे. या सर्व बाबीचा तपास करण्यात येईल असेही नितीन राऊत यांनी सांगितले होते.
याला उत्तर देण्यासाठी चंदशेखर बावनकुळे यांनी फेसबुक पोस्ट लिहून चौकशी करावी असे म्हणाले. यात ते म्हणाले “साहेब १४ महिने चौकशी का केली नाहीत मग? शब्दात इनामदारी आणि तुमच्यात धमक असेल तर करा चौकशी आणि किती दिवसात करणार हे जाहीर सांगा आणि तेही जमत नसेल तर स्पष्ट सांगा नाहीतर आम्हीच उर्जा विभागाच्या सावळा गोंधळ मायबाप जनतेला जाहीर करतो. दुध का दुध पाणी का पाणी!”
साहेब, १४ महिने चौकशी का केली नाहीत मग? शब्दात इमानदारी आणि तुमच्यात धमक असेल तर करा चौकशी आणि किती दिवसात करणार हे जाहीर सांगा आणि तेही नसेल जमत तर स्पष्ट सांगा नाहीतर आम्हीच ऊर्जा विभागाचा सावळा गोंधळ मायबाप जनतेला जाहीर करतो. दूध का दूध-पानी का पानी !https://t.co/QK9TswgvRU
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) March 20, 2021
यापूर्वी मुंबईत झालेल्या बत्तीगुल प्रकरणात नितीन राऊत आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकमेकावर आरोप प्रत्यारोप केले होते. वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्याचे प्रकार राज्यभरात सुरु आहे. यामुळे उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यावर मोठ्या प्रमाणात टिका होत आहे.