Monday, September 26, 2022
Homeब-बातम्यांचापोलिसच स्फोटके ठेवत असतील तर जनतेने कुणाकडे दाद मागायची?

पोलिसच स्फोटके ठेवत असतील तर जनतेने कुणाकडे दाद मागायची?

पुणे: सचिन वाझे प्रकरणात राजकारण तापले असून मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी करण्यात आली. आता विरोधीपक्ष अधिक आक्रमक झाले असून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे. याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहीले आहे.

सचिन वाझे यांची पाठराखण करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली करून मोठी कारवाई केल्याचा आव आणला आहे. ही कारवाई म्हणजे वरवरची मलमपट्टी आहे. राजकीय आशीर्वादामुळे एक पोलीस अधिकारी सरकारी यंत्रणांचा वापर करून गुन्हे करत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती धोक्यात आली आहे. याप्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घ्यायला हवा. पुढे पाटील म्हणाले,उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवल्या प्रकरणात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आवाज उठवला त्यावेळी ठाकरे सरकार पांघरून घालण्याचा प्रयत्न करत होते. एनआयएने केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसच उद्योगपतीला धमकी देण्यासाठी स्फोटके ठेवत असतील तर जनतेने कुणाकडे दाद मागायची? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

सरकारने या स्थितीची जबाबदारी स्विकारायला पाहिजे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यावा. केवळ पोलीस अधिकाऱ्यावर बदलीची कारवाई करणे म्हणजे लोकांचा राग शांत करण्यासाठी केलेली किरकोळ कारवाई केली आहे. सरकारने या प्रकरणात मुळापर्यंत जायला हवे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments