Sunday, September 25, 2022
Homeमत-मतांतरेराजा का बेटा अब राजा नही बनेगा, तर मग संतोष दानवे आमदार...

राजा का बेटा अब राजा नही बनेगा, तर मग संतोष दानवे आमदार कसे काय?

आज सकाळी भाजपचे जेष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका करताना राजाचाच मुलगा राजा होईल असं नाही,आता राजा मतपेटीतून जन्माला येतो पोटातून नाही. असं वक्तव्य रावसाहेब दानवेंनी केले.

अर्थातच त्यांचा रोख हा ठाकरेंच्या घराणेशाहीवर होता. पण, खरंच स्वतः खासदार असताना आपल्या मुलाला आमदारपदावर बसवणाऱ्या दानवेंना घराणेशाहीवर बोलण्याचा नैतिक अधिकार तरी आहे काय?

त्यामुळे दानवेंचे सुपुत्र असलेले संतोष दानवे जे २०१४ पासून भोकरदन मतदार संघातून भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत ते सुद्धा घराणेशाहीचेच प्रोडक्ट ठरतात. तर मग ‘राजाचाच मुलगा राजा होईल असं नाही’ जर हे खरं असेल तर संतोष दानवे आमदार कसे काय?

भोकरदन- दानवेंचा गड:

जालना जिल्ह्यात निवडणूक काळात सर्वाधिक चर्चेचा विषय असतो ते भोकरदन विधासभा मतदार संघाचा. केंद्रीय राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे यांच्या प्रभावाखाली असलेला हा मतदारसंघ. भोकरदन आणि जाफराबाद या दोन तालुक्यांचा समावेश असलेल्या या विधानसभा क्षेत्रात शेती व्यवसायावर आधारीत असलेला मोठा ग्रामीण मतदार आहे.

याच ग्रामीण भागात ग्रामपंचायत सदस्यांपासून केंद्रीय राज्यमंत्री पदापर्यंतच्या प्रवासात रावसाहेब दानवे यांनी आपला प्रभाव कायम ठेवला आहे. भोकरदन मतदारसंघात आणि पर्यायाने राज्याच्या राजकारणात ४० वर्ष असणाऱ्या दानवेंचा संघर्ष हाच या मतदारसंघाचा इतिहास झाला आहे.

जालना जिल्हा निर्माण होण्याअगोदर भोकरदन तालुका औरंगाबादमध्ये होता. १९९० मध्ये रावसाहेब दानवे पहिल्यांदा भोकरदनमध्ये आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी २००३ पर्यंत आपले वर्चस्व कायम ठेवले होते.

२००३ साली भोकरदन मतदारसंघातील वर्चस्वाला धक्का:

 मात्र, २००३ साली पोटनिवडणुकीत चंद्रकांत दानवे विरुद्ध रावसाहेब दानवे असा संघर्ष सुरु झाला. या संघर्षामध्ये चंद्रकांत दानवे यांनी बाजी मारली. त्यांनी तब्बल १२ वर्ष आपले वर्चस्व राखण्यात यश मिळवले.

२००४ साली त्यांनी भाजप उमेदवार शिवाजीराव थोटे यांचा प्रभाव केला होता. तसेच २००९ साली खुद्द रावसाहेंबांच्या पत्नी निर्मलाताई दानवे यांचा देखील पराभव केला होता. 

सुपुत्राला बसवले आमदारपदी:

मात्र, २०१४ साली रावसाहेब दानवेंच्या सुपुत्राने आपले पारंपरिक विरोधक असलेल्या चंद्रकांत दानवेंचा पराभव करत वचपा काढला होता. संतोष दानवे २०१४ साली भोकरदन मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आले.

२००५ साली संतोष दानवे यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली होती. पुढे, २०११ साली त्यांना भारतीय युवा मोर्चाचे उपाध्यक्ष बनविण्यात आले होते. २०१४ आणि २०१९ असे सलग दोन टर्म ते भोकरदनचे आमदार आहेत.

२०१९ साली त्यांची जालना जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती या निम्मिताने जालन्यातील भाजपच्या राजकारणात आपलाच शब्द अंतिम असणार हे रावसाहेब दानवेंनी दाखवून दिले होते. रावसाहेब दानवे यांचे पुत्र असल्याने त्यांच्याकडे राजकीय उत्तराधिकारी म्हणून पाहिले जाते.

मग आता संतोष दानवे जर रावसाहेबांसारख्या मात्तबर नेत्याचे सुपुत्र नसते तर त्यांना राजकारणात इतकी मोठी मजल मारता आली असती का? याचे उत्तर रावसाहेब दानवे देतील का?

हे ही वाचा:  

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री होऊन खरंच चूक केली का? 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments