महामारीला आता थांबवू शकलो नाही तर देशातील परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते
दिल्ली: महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश जास्त बाधित कोरोना रुग्ण अधिक संख्येने वाढताना दिसत आहे. देशातील ७० जिल्ह्या मध्ये रुग्ण वाढीचा दार १५० टक्के पेक्षा जास्त आहे. जर या महामारीला आपण आता थांबवू शकलो नाही तर देशातील परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. कोरोनाच्या दुसरा लाटेला थांबवावे लागेल. यासाठी लवकर पावले उचलावे लागणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
मोदी म्हणाले कोरोना विरोधातील लढाईला एक वर्ष पूर्ण होत आहे. भारताने कोरोना विरोधात केलेल्या कामाचे जगभरातून कौतुक होत आहे. बरे होणाऱ्याचे प्रमाण ९६ टक्यांपेक्षा जास्त आहे. मृत्युदर सुद्धा सर्वात कमी आहे. जगभरात अनेक देशांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सामोरे जावे लागले आहे. भारतात राज्यात कोरोना बाधितांचा आकडा कमी झाला होता मात्र आता अचानक बाधितांची संख्या अचानक वाढत आहे. काही ठिकाणी टेस्टिंग आणि लसीकरण कमी होत आहे याचा विचार करावा लागणार आहे.
आता पर्यंत आपण चांगल्या प्रकारे काम केले आहे. यामुळे आत्मविश्वास आला आहे. त्याचा विपरीत परिमाण होऊ नये. जनतेला भीती दाखवायची नाही. मात्र, सावधगिरी पाळावी लागणार आहे. जुन्या अनुभवाचा वापर करून आपल्याला आताची स्थिती बदलायला हवी. काही राज्यांनी चांगल्या प्रकारे परिस्थिती सांभाळली आहेत.
कन्टेनमेंट झोन, टेस्ट, ट्रक आणि ट्रीट करायला हवे. ७० टक्क्या पेक्षा जास्त RC-PCR टेस्ट करायला हवे. काही राज्यात रॅपिड टेस्ट जास्त घेण्यात येत आहे. त्यांनी बदल करायला हवा. केरळ, आसाम, उत्तरप्रदेश या रॅपिड टेस्ट होत आहेत.
पहिल्या टप्प्यात कोरोनाचा प्रादुर्भाव गावात पोहचला नव्हता. यावेळी लहान शहरात कोरोना वाढतोय. यावर लक्ष ठेवावे लागणार आहे. जर गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर आपली व्यवस्था अपुरी पडेल. लहान शहरात टेस्टिंग वाढवायला हवी.
लसीकरणाची गती वाढविण्यात आली आहे. एका दिवसात ३० लाख लोकांना लस देण्यात आल्या आहेत. याचबरोबर काही राज्यात वैक्सीन खराब झाल्याचे ऐकण्यात आले. आंध्रप्रदेश आणि तेलंगणात १० टक्के वैक्सीन खराब झाल्याचे समजते. उत्तरप्रदेश मध्ये सुद्धा खराब झाल्याचे समजते. खराब होऊ नये यासाठी प्रयत्न करायला हवे. शून्य टक्के वैक्सीन खराब होतील अस राज्याने काम करायला हवा.
स्थानिक प्रशासनाने सूक्ष्म कन्टेनमेंट झोन बनवायला हवे. तिथेच थांबवायला हवे. लस मोठ्या प्रमाणात बनत आहे. जर आपण यातून बाहेर पडलो नाही तर ३ वर्ष जातील.