जर टाटा करु शकतात तर इतर का नाही? – दिल्ली उच्च न्यायालय

in-the-second-wave-of-corona-the-children-got-corona-what-is-the-plan-for-that-supreme-court
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

नवी दिल्ली : भारतातील अनेक राज्यांत वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. देशाची राजधानी दिल्लीतही ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. यावरुन दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या नियोजनावर ताशेरे ओढले तर त्याचवेळी टाटा सन्सचं कौतुकही केलं आहे.
न्यायालयाने म्हटलं, जर टाटा सन्स आपल्या स्टील प्लांटमधून कोरोना बाधित रुग्णांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास पुढाकार घेऊ शकतात तर इतर स्टील प्लांट का नाही करु शकत. उद्योगांना एक किंवा दोन आठवडे ऑक्सिजन मिळाल नाही तर काम पुढे ढकललं जाऊ शकतं. मात्र, जर मनुष्यालाच ऑक्सिजन मिळालं नाही तर तो पुढे जाऊ शकत नाही या शब्दांत न्यायालयाने प्रतिक्रिया दिली आहे.
न्यायालयाने पुढे म्हटले की, सरकारला मनुष्याच्या जीवनाचे महत्व नाहीये असं दिसून येतंय. केंद्राने स्टील प्लांटद्वारे उत्पादित होणाऱ्या ऑक्सिजनचा संपूर्णपणे ताबा घ्यावा आणि आवश्यकतेनुसार रुग्णालयांत ऑक्सिजनचा पुरवठा करावा असेही न्यायालयाने म्हटले आहे.

देशाला ऑक्सिजन पुरवठ्यासाठी काय केले?
दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला म्हटलं, आमची चिंता केवळ दिल्लीतील ऑक्सिजनच्या तुटवड्याच्या संदर्भात नाहीये तर संपूर्ण देशातील ऑक्सिजनच्या पुरवठ्या संदर्भात आहे. देशभरात ऑक्सिजनचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी तुम्ही कोणती पावले उचलली आहेत अशी विचारणा यावेळी दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केली.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *