|

नवनीत राणांनी तेव्हा आवाज उठवला असता तर दिपाली चव्हाण यांचा जीव वाचला असता

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

पुणे: वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून अमरावती येथील वनपरिक्षेत्र महिला अधिकारी दिपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली आहे. खासदार नवनीत राणा यांनी दिपाली चव्हाण यांच्या तक्रारीकडे वेळेत लक्ष दिले असते तर दिपाली चव्हाण यांच्या सारख्या अधिकारी महिलेचा जीव गेला नसता, असे वक्तव्य राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केले. दिपाली चव्हाण यांनी स्थानिक खासदार नवनीत राणा यांच्याकडे मदत मागितली होती. तेव्हा खासदारांनी आवाज उठवायला हवा होता. कदाचित तेव्हा आवाज उठविला असता तर एक कार्यक्षम अधिकाऱ्याचा जीव वाचला असता. असे चाकणकर म्हणाल्या.

दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्ये नंतर भाजपच्या नेत्यांनी ठाकरे सरकारवर टिका सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी दिपाली चव्हाण यांच्या पत्राचा दाखला देत स्थानिक खासदार नवनीत राणा यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या नवनीत राणा यांचा अप्रत्यक्ष सहभाग आहे का असा सवाल चाकणकर यांनी उपस्थित केला आहे.

वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून वनपरिक्षेत्र महिला अधिकारी दिपाली चव्हाण यांची आत्महत्या

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्र महिला अधिकारी यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. दिपाली चव्हाण असे महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. DFO विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे धक्कादायक घटना अमरावती येथे घडली आहे.

दिपाली यांनी सूसाईड नोट लिहून आत्महत्या केली आहे. ४ पानाच्या सूसाइड नोट मध्ये वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी DFO विनोद शिवकुमार यांनी मानसिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

काय आरोप केलेत DFO विनोद शिवकुमार यांच्यावर

DFO विनोद शिवकुमार यांनी पहिले काही दिवस चांगली वागणूक दिली. मात्र काही दिवसानंतर आजूबाजूच्या कर्मचाऱ्यानी कान भरायला सुरुवात केल्या नंतर तुला नोटीस काढतो, तुझ्या विरोधात चार्जशीट करतो अशी धमकी देऊ लागले. वारंवार निलंबित करण्याची धमकी देऊ लागले. काही गावांचे पुर्नवसन होत आहे. त्या गावातील नागरिक भेटायला आल्यावर त्यांच्यासमोर शिव्या दिल्या. मी एकटी राहत होते. त्यांनी त्याचा फायदा घेतला. कर्मचाऱ्यांना घाण-घाण शिव्या देतात. माझ्या आत्महत्येला विनोद शिवकुमार हे जबाबदार असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *