कोरोनाचां जंतू सापडला तर फडणवीस यांच्या तोंडातच कोंबला असता

बुलढाणा : मला जर कोरोनाचा जंतू सापडले असते तर, मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते, असे वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केले. फडणवीस यांनी कोरोना वरून राजकारण करू नये असा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी केला.ते शनिवारी बुलढाण्यात बोलत होते. त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली.
सध्या राज्या बरोबर देशातही कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. मात्र अशावेळी विरोधी पक्ष मदत करण्या ऐवजी याचे राजकारण करत आहे. असा आरोप बुलढाणा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख केला. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकर यांचा वरही टीका केली.
केंद्र सरकारने राज्यसरकारला मदत करायची सोडून पाकिस्तान, बांगलादेश ला मदत केली आहे. गुजरातला मोफत इंजेक्शन दिले. कोरोना काळात कोणीच राजकारण करून नये असेही गायकवाड म्हणाले. जर का माणसे जिवंत राहिली नाही तर तुम्हाला कोण मतदान करेल अस प्रश्न तुम्ही सरकारला विचारत आहात. त्याशिवाय तुम्ही तर सरकारला पडायला निघाले आहेत. मग अगोदर माणसे जिवंत ठेवा मगच राजकारण करा असे आवाहन संजय गायकवाड यांनी केले.