| |

नियुक्त्या झाल्या नाही तर पुन्हा आंदोलन करणार: पडळकर

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

पुणे: आयोगाकडून नियुक्तीपत्र मिळत नसल्याने अनेक उमेदवार हैराण आहेत. काही जण शेतमजुरी सुद्धा करत आहेत. एमपीएससी मध्ये पास होऊन सुद्धा नियुक्ती झाली नाही. ते उमेदवार गेल्या काही वर्षापासून हैराण आहेत. जर त्यांना सामावून घेतले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला.

नियुक्ती रखडलेल्या उमेदवारांनी पुण्यात पत्रकार परिषद आयोजित केली होती. मात्र त्यांना परवानगी नाकारण्यात आली. त्यानंतर पडळकर पत्रकारांशी बोलत होते.

२०१९ मध्ये परीक्षा होऊनही निवड प्रक्रिया पूर्ण झालेल्या ४०० हून अधिक मुलांची भरती प्रक्रिया रखडलेली आहे. हे विद्यार्थी आपल्या परीने आवाज उठवत आहेत. तर काही उमेदवारांनी आपल्यावर शेतमजुरी करण्याची वेळ आल्याचे सांगितले.

निवड झालेल्या मात्र त्यांना नियुक्त्या देण्यात येत नसलेल्या बाबत सरकार कधी स्पष्टीकरण देणार आहे असा प्रश्न सुद्धा पडळकर यांनी यावेळी विचारला. पडळकर यावेळी म्हणाले, फडणवीस यांच्या कार्यकाळात सर्वाधिक नोकर भरती झाली. मराठा आरक्षणात सरकार गंभीर नाही. त्यामुळे घोळ निर्माण झाला आहे.

खंडपीठाना ९ डिसेंबरला नियुक्ती द्यावी असे सांगितले होते. ही सर्व मुळे गावगाड्यातील मूळ आहेत. याप्रक्रियेत ७९ मराठा मुल सर्वसाधारण मधून पास झाले आहे. त्यांच्यावर अन्याय झाला आहे. विद्यार्थी वर अन्याय होत आहे? इथे विद्यार्थी येणार होते मात्र त्यांच्यावर पोलिसांच्या मार्फत दबाव टाकण्यात येत आहे. जर विद्यार्थांना नियुक्त्या दिल्या नाहीत तर मुंबईत आंदोलन करू असा इशारा पडळकर यांनी दिली.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *