तिसरं मुल जन्माला आल्यास तुरूंगवास झालाच पाहिजे, कंगना रनौतची नवीन मागणी.

Kangana Ranaut's difficulty increases!
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत कायम तिच्या वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत असते. आता तिने लोकसंख्या नियंत्रणावर ट्विट केलं आहे. ‘तीन अपत्य असल्यास तुरूंगवासाची शिक्षा झालीचं पाहिजे…’ असं ट्विट तिने केलं आहे. कंगनाने तिसरं मुल जन्माला आल्यास दंड आणि तुरूंगवास झालाच पाहिजे अशी मागणी केली आहे. कंगनाच्या या वक्तव्यामुळे ती ट्रोल होत आहे. यावर नेटकऱ्यांनी देखील तुला दोन भाऊ-बहिण असल्याची आठवण करून दिली आहे.
कंगना ट्विट करत म्हणाली, ‘आपल्या लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी कायदे कठोर करण्याची गरज आहे. हे सत्य आहे की इंदिरा गांधी निवडणूक हारल्या होत्या. त्यानंतर त्यांची हत्या देखील झाली होती. कारण त्यांनी हा मुद्दा उचलून धरला होता. जर तिसरं मुल झालं तर दंड आणि तुरूंगवास झालाचं पाहिजे. असं ट्विट कंगनाने केलं आहे. ‘


कंगनाच्या ट्विटमुळे तिला तुफान ट्रोल करण्यात येत आहे. कॉमेडियन सलोनी गौरने कंगनाच्या भावंडांचा फोटो स्क्रिनशॉट काढून पोस्ट केला आहे. सध्या कंगनाचं हे ट्विट तुफान चर्चेत आहे. नेटकरी देखील तिला तुफान ट्रोल करत आहेत.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *