मी त्यांचा कायम ऋणी राहीन; रिषभ पंतचं खास ट्वीट

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार विकेटकीपर बॅट्समन रिषभ पंत याच्या गाडीला ३० डिसेंबर २०२२ रोजी भीषण अपघात झाला होता. या अपघातात रिषभ पंतला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर रिषभ पंतला देहरादून येथील मॅक्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होत. त्यानंतर त्याला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात हलवण्यात आले. याठिकाणी रिषभ पंतवर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता रिषभची प्रकृती स्थिर असून त्यामध्ये सुधारणा होत आहे.

या अपघातातून सावरल्यानंतर रिषभ पंतने ट्वीट करत क्रिकेट चाहत्यांचे आभार मानले. तसेच त्याने दोन तरुणांचा खास उल्लेख करत आभार मानले आहेत. संबंधित तरुणांचे फोटो शेअर करत “मी तुमचा आयुष्यभर ऋणी राहीन” असं पंतने लिहिलं आहे. या दोन तरुणांनी अपघाग्रस्त रिषभ पंतची मोलाची मदत केली होती. रजत कुमार आणि निशू कुमार अशी या दोन तरुणांची नावं आहेत.

रिषभ पंतने आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, “मी वैयक्तिकरित्या सर्वांचे आभार मानू शकत नाही. परंतु मी हे दोन हिरो रजत कुमार आणि निशू कुमार यांचे आभार मानू इच्छितो. अपघात झाल्यानंतर याच तरुणांनी माझी मदत केली. मी सुरक्षितपणे रुग्णालयात कसा पोहोचेल, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मी सदैव त्यांचा ऋणी राहीन.”


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *