मी सरकारकडे सरसकट लसीकरणाची मागणी केली होती

पुणे : कोरोना विरोधाच्या लढाईत केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. १ मे पासून देशातील सर्व १८ वर्षावरील प्रत्येकाला कोरोनाची लस देण्यात येणार आहे. याशिवाय लस उत्पादकांनी ५० टक्के साठा राज्य सरकराला द्यावा असे सांगण्यात आले आहे. याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करून सरसकट लसीकरणाची मागणी केली होती असे सांगितले आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ट्वीट करून
“केंद्र सरकारने १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरणास परवानगी दिली. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मी सरकारकडे सरसकट लसीकरणाची मागणी केली होती. सरकारने आता १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरणासाठी परवानगी दिली, याबद्दल केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन जी आपले मनापासून आभार. नागरीकांना विनंती आहे की, कोरोनाच्या विषाणूची साखळी तोडण्यासाठी हे लसीकरण अतिशय आवश्यक असून आपण सर्वांनी १ मे पासून जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन अवश्य लस घ्यावी. काळजी घ्या, सुरक्षित रहा असे सुद्धा त्यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे.