फाटके जीन्स वापणारे समाजात कशा प्रकारे संस्कार घडवतील?
मुख्यमंत्री तीर्थ सिंह रावत यांची मुक्ताफळे
देहरादून : उत्तराखंडचे नवीन मुख्यमंत्री तीर्थ सिंह रावत यांनी पदभार स्वीकारल्यापासूनच चर्तेत आले आहे. आता त्यांनी पुन्हा एकदा केलेल्या वक्त्याव्यामुळे त्यांच्यावर टिका करण्यात येत आहे. महिलांना फाटलेले जीन्स परिधान करतांना पाहून आश्चर्य वाटते. यामुळे समाजात काय संदेश जाईल, असा प्रश्न पडतो, अस वक्तव्य तीर्थ सिंह रावत यांनी देहरादून येथील आयोजित कार्यक्रमात केले होत. यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टिका होत आहे.
‘मी जयपूरला एका कार्यक्रमासाठी जात असताना विमानात चढलो. बाजूलाच एक भगिनी बसल्या होत्या. त्यांनी गम बूट घातला होता…वर पाहिलं तर त्यांनी गुडघ्यावर फाटलेली जीन्स घातली होती. त्यांच्यासोबत दोन मुलंही होती. मी त्यांच्याशी बोलत असताना समजल की त्या एक स्वयंसेवी संस्था चालवतात’ असा एक अनुभव आल्याचे तीर्थ सिंह रावत यांनी सांगितले. सोबतच त्यांनी आपले विचार उपस्थिता समोर मांडले.
#WATCH मैं एक दिन हवाई जहाज से जयपुर से आ रहा था। मेरे बगल में एक बहनजी बैठी थी। मैंने उनकी तरफ देखा नीचे गम बूट थे। जब और ऊपर देखा तो जींस घुटने से फटी हुई थी। 2 बच्चे उनके साथ में थे। महिला NGO चलाती है। समाज के बीच में जाती हो। क्या संस्कार दोगे?: उत्तराखंड CM तीरथ सिंह रावत pic.twitter.com/sGri6pPH7K
— ANI_HindiNews (@AHindinews) March 17, 2021
‘आजकाल महिला फाटलेल्या जीन्स वापरता, हे बरोबर आहे का? हे कसले संस्कार? महिल्यांच्या गुडघ्यावर फाटलेले जीन्स पाहून वाटत की, यामुळे समाजात काय संदेश जाईल. मुलांवर कसे संस्कार जातील? हे सर्वस्वी पालकावर जात. स्वयंसेवी संस्थेत काम करणारी महिला असे कपडे परिधान करत असेल तर तर त्या समजाला कशा प्रकारे संस्कार घडवतील. आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा अस काही नव्हत. आजकाल फाटलेली जीन्स म्हणजे स्टेट्स सिम्बॉल समजल्या जाते. व्यक्ती जितकी फाटलेली जीन्स घालेल तेवढी श्रीमंत समजली जाते. आपण किती पुढारलो तरी संस्कार गरजेचे आहेत असेही तीर्थ सिंह रावत म्हणाले.