उद्या नवऱ्याला डबा कसा द्यायचा? पुण्यातील महिलेचा महापौरांना प्रश्न
पुणे: पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ सोशल मिडीयावर चांगलेच सक्रीय असतात. सध्या कोरोना काळात ते अधिक सक्रीय असून शहरात दररोज आढळणारे कोरोनाचे नवे रुग्ण, महापालिकेच्या वतीने सुरु करण्यात आलेले उपक्रम आदी बाबत माहिती देत असतात.
पुण्यातील वाढत्या कोरोन बाधितांची संख्या लक्षात घेता शहरात शनिवार पासून दिवसा जमावबंदी तर रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच, रविवार झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात सोमवारपासून कडक नियम लागू होणार असून, रात्री ८ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी असणार असून, दिवसा जमावबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुण्यातील नागरिकांचे नियमाबाबत गोंधळ हवू नये म्हणून महापौर मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी सायंकाळी ट्विट करून ”पुण्यात संध्याकाळी ६ पासूनच संचार निर्बंध! राज्य सरकारने आज जाहीर केलेल्या नव्या निर्बंधांनुसार रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत संचार निर्बंध घोषित करण्यात आले असले, तरी पुणे शहरात संध्याकाळी ६ पासूनच संचार निर्बंध असणार आहेत. पुणेकर नागरिकांनी याची नोंद घ्यावी!” असे ट्विट केले होते.
यावर पुण्यातील एका महिलेने प्रश्न उपस्थित करत “तुमच्या या नियमांमुळे पीठ गिरणी लवकर बंद झाली आणि माझा पीठाचा डबा गिरणीतच राहिला.उद्या नवऱ्याला डबा कसा द्यायचा? असा भन्नाट प्रश्न उपस्थित केला. यावर नेटकऱ्यानी महिलेला प्रश्न करून डिवचले आहे, तसेच सोशल मिडीयावर हे ट्विट प्रचंड व्हायरल होत आहे.