| |

नाना पटोले मोदींना कसे नडले होते, आठवतंय का?

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

महाराष्ट्रातले सध्याचे राजकीय वातावरण व परिस्थिती पाहता नाना पटोले यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्याला अनेक अर्थांनी महत्त्व मिळाले आहे. एकीसाठी भाजपचे खासदार राहिलेले नाना पटोले यांनी ‘भाजप आणि नरेंद्र मोदी’शेतकरीविरोधी असल्याची टीका करत मोदी लाटेत खासदारकीचा राजीनामा दिला होता. महाराष्ट्रात २०१९ मध्ये त्यांनी नितीन गडकरी यांच्याविरोधात नागपूर लोकसभा निवडणूक लढवली होती त्यात ते पडले. मात्र त्यानंतर पुन्हा विधानसभेसाठी उभे राहिले आणि साकोली चे आमदार म्हणून विधानसभेवर निवडून आले. आणि महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर ते विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांना निवडण्यात आले. अलीकडेच त्यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावर नेमणूक निश्चित झाली आहे.

शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणारा आक्रमक नेता अशी ओळख असणारे नाना पटोले ने काही वर्षांपासून मोदींना टक्कर देत आले आहेत. प्रथम काँग्रेस पक्ष आणि त्यानंतर भाजपामध्ये प्रवेश आणि पुन्हा काँग्रेस पक्ष असा एकंदरीत त्यांचा राजकीय प्रवास आहे. मोदी विरोधात एकच चेहरा म्हणून सर्वांच्या नजरेत आहेत त्याचं कारणही तितकेच ताकदीचं आहे ते म्हणजे त्यांची आक्रमक शैली आणि अभ्यासू व्यक्तिमत्व.

२००९ मध्ये काँग्रेसकडून नाना पटोले हे आमदार होते तेंव्हा मध्ये जेव्हा केंद्र सरकारने ७२ हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली होती. विशेष म्हणजे विदर्भातील शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून ही कर्जमाफीची घोषणा करण्यात आली होती. तेव्हा ‘कर्जमाफीतील तरतुदी व विदर्भातील शेतकरी’ या विषयावर त्यांनी सभागृहात चर्चा करायची मागणी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली होती. आणि एकमेव व नाना पटोले असे सदस्य होते ज्यांनी ही चर्चा लावून धरली होती. मात्र त्यांच्या चर्चेनंतर तत्कालीन महाराष्ट्राचे कृषिमंत्री थोरात यांनी स्पष्ट केले की केंद्र सरकारच्या कर्जमाफी मध्ये राज्य सरकार कसल्याही प्रकारचा वाटा देणार नाही. या भूमिकेवर नाराज होऊन पटोले यांनी तात्काळ आमदारकीचा राजीनामा सभागृहात सादर केला होता. त्यानंतर खुप काळानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला होता.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील ते गोंदिया भंडारा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. मात्र त्यानंतर २०१४ ते १७ या दोन ते अडीच वर्ष त्यांनी खासदारकीचे पद भूषविले. परंतु शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी भाजपशी आहे ते शेतकऱ्यांच्या विकासाला गांभीर्याने घेत नाही, पंतप्रधान मोदीच नाहीतर मुख्यमंत्री फडणवीस देखील अपयशी आहेत अशी टीका करत त्यांनी खासदारकीचा राजीनामा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केला होता.

२०१४ च्या निवडणुकीच्या वेळेस प्रचारादरम्यान नरेंद्र मोदी आणि भाजप पक्षाने शेतकऱ्यांना आश्‍वस्त केले होते आणि सत्तेत आल्यावर त्यांना शेतकरी वर्गाचा विसर पडला होता. २०१४ ची निवडणूक मोदी जिंकून आले त्यानंतर अगदी एकाच महिन्यात मोदींनी स्वामीनाथन समितीची शिफारस लागू करू देणार नाही असे सुप्रीम कोर्टात स्पष्ट केले आणि पहिला विश्वासघात त्यांनी शेतकरी वर्गासोबत केला. त्याच दरम्यान पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्र छत्तीसगड व मध्य प्रदेशच्या खासदारांना बोलावून ‘ तुमच्या मतदारसंघात काय कामकाज चालले आहे तसेच एकंदरीत केंद्र सरकारच्या कामकाजाबद्दल चे मतं मांडायला सांगितली गेली.

केंद्र सरकारची शेतकऱ्यांबद्दलच्या भूमिकेबद्दल नाना पटोले यांनी त्यांचे मत व्यक्त केले कि, कृषिप्रधान असणाऱ्या भारत देशातील शेतकऱ्यांकडे आपण दुर्लक्ष करतोय. आपण शेतकऱ्यांना फक्त नाम मात्र काही प्रमाणात सबसिडी देतो आहोत. पण इंग्लंड सारख्या देशामध्ये ८५ टक्के भागीदारी ही शासनाची असते. जर आपल्याला भारत देशात आर्थिक सुधार आणण्यासाठी इंग्लंड सारखे धोरण भारतात देखील आणणे गरजेचे आहे. ८५% तर शक्य नाही परंतु शेतीमधील ५०% भागीदारी ही केंद्र सरकारची असावी, थोडक्यात शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून घटनात्मक बदल करावेत परिणामी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील अशी एकंदरीत भूमिका पटोले यांनी मांडली होती. मात्र या भूमिकेचे पंतप्रधान मोदींनी स्वागत करण्याच्या ऐवजी त्यांना पटोले यांचा राग आला. मोदी पटोले यांच्या भूमिकेशी सहमत नव्हते तर पटोले हे त्यांच्या भूमिकेवर ठाम होते. मी जनतेचा प्रतिनिधी आहे मला त्याची संपूर्ण जाणीव आहे असे म्हणत, पटोले यांनी मागचा पुढचा विचार न करता पदाला आणि भाजपाला सोडचिठ्ठी दिली. आणि स्वगृही म्हणजेच काँग्रेसमध्ये परतले. त्या वेळी राजीनामा देणारे भाजपचे ते पहिले खासदार ठरले होते.

ज्या गोष्टी सामाजिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये अडचणीच्या वाटतात, सरकारच्या माध्यमातून जे बदल व्हायला हवेत परंतु ते होत नसतील तर त्याबाबतीतची मतं स्पष्टपणे पक्षप्रमुखाकडे मांडण्याचा ठामपणा अंगी असणारे नाना पटोले हे इतरांपेक्षा वेगळे ठरतात. नाना पटोले यांचे व्यक्तिमत्व अगदी जिद्दी आणि महत्त्वकांक्षी तसेच तडकाफडकी नेतृत्व आहे. आपण ज्या पदावर विराजमान आहोत ते सर्वसामान्यांसाठी चे आहे अशी जाण त्यांनी ठेवली. ज्या पक्षात त्यांचे जमले नाही त्यांच्याशी सत्तेवर असताना पदत्याग करण्याची हिम्मत ठेवणारा नेता पुढे जाऊन काँग्रेस पक्षाला व महाराष्ट्रातील राजकारणाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवू शकणारा नेता आहे यात शंका नाही. काँग्रेस डबघाईला आली तर त्याला नवसंजीवनी देणारा नेता म्हणून ही त्यांच्याकडे आशेने आपण सर्वच पाहतोय.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *