Wednesday, September 28, 2022
Homeब-बातम्यांचासत्तेसाठी किती जणांना वाचविणार

सत्तेसाठी किती जणांना वाचविणार

मुंबई: पुण्यातील एल्गार परिषदेत अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी नेता शर्जिल उस्मानीने धार्मिक तेढ वाढविणारी, आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. याप्रकरणात भाजपने पुणे पोलिसात तक्रार दाखल केली होती.

शरजील उस्मानी याने हिंदू समाजाबद्दल केलेल्या अवमानजनक, आक्षेपार्ह, गंभीर वक्तव्यांची तातडीने दखल घेऊन त्यावर राज्य सरकारतर्फे कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. मागच्या आठवड्यात उस्मानी शर्जील याचा पुणे पोलिसांनी जबाब नोंदवा. यानंतर आता हे प्रकरण तापले आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट केले आहे, “आपले मुख्यमंत्री विधानसभेत छातीठोकपणे म्हणाले,‘शर्जिल उस्मानी जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असेल तर त्याच्या मुसक्या आवळून शोधून आणणार म्हणजे आणणारच, प्रत्यक्षात काय? तो येऊन गेला, जबाब देऊन गेला आणि महाविकास आघाडी सरकारने प्रत्यक्षात काय केले ?’ असा सवाल करत फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

‘मूळ तक्रारीत भादंविचे २९५ अ कलम समाविष्ट असताना सुद्धा एखाद्या विशिष्ट धर्माला लक्ष्य करण्यासाठी लावले जाणारे हे कलम पद्धतशीरपणे एफआयआरमधून वगळले गेले. लावले ते कलम १५३ अ, जे विविध घटकांमध्ये शत्रुत्त्व निर्माण होईल, अशा विधानांसाठी लागते. खरे तर एफआयआर २९५ अ, १५३ अ या दोन्ही कलमांतर्गत असायला हवा होता.’असंही या पोस्ट मध्ये फडणवीसांनी म्हटलंय.

‘न्यायव्यवस्था आणि सरकारी प्रशासनतंत्रा’विरोधात युद्ध पुकारण्यासाठी १२४अ हे सुद्धा कलम लावायला हवे होते. पण, प्रत्यक्षात करताहेत जामीन मिळण्यासाठी मदत.अखेर सत्तेसाठी आणखी किती लोकांना वाचविणार मा. उद्धवजी? ‘ असे सवाल देखील देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना केलेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments