Friday, October 7, 2022
Homeब-बातम्यांचादेवेंद्र फडणवीस यांच्या ४५ वर्षाखालील पुतण्याला लस मिळते कशी? काँग्रेसचा सवाल

देवेंद्र फडणवीस यांच्या ४५ वर्षाखालील पुतण्याला लस मिळते कशी? काँग्रेसचा सवाल

नागपूर : एकीकडे देशभरात कोरोनाने थैमान घातले असताना, दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा मिळणे अवघड झाले आहे. तसेच राज्यात लसीच्या पुरवठ्यावरून चांगलेच वातावरण पेटले आहे. सध्या देशभरात ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीस याने वय वर्ष ४५ पेक्षा कमी असताना कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्याचे समोर आले आहे. यावरून देवेंद्र फडणवीस यांना मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत असून प्रश्न सुद्धा विचारण्यात येत आहे.

तन्मय फडणवीस याने सोमवारी नागपूर येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन कोरोना प्रतिबंधात्मक लसीचां दुसरा डोस घेतला. त्याने हा फोटो आपल्या इंस्टाग्राम वर शेकर केला होता. टीका झाल्यानंतर तन्मयने हा फोटो डिलीट केला. यावरून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारण्यात येत आहे.
याबाबत महाराष्ट्र काँग्रेसने सुद्धा प्रश्न उपस्थित केला आहे. ४५ वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट मोदी सरकारने घातलीये. असं असताना फडणवीसांच्या ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी?
भाजप नेत्यांच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा मग इतर लोक काय किडेमुंग्या आहेत का? त्यांच्या जिवाची काहीच किंमत नाही का! असा सवाल महाराष्ट्र काँग्रेसने विचारला आहे.

देवेंद्र फडणवीस तुमचा पुतण्या तन्मय फडणवीस हा ४५ वर्षाचा आहे का? जर नाही तर तो लसीकरणसाठी कसा पात्र ठरतो? रेमडेसिविर प्रमाणे तुम्ही लसीचा साठा केला आणि ते तुम्ही तुमच्या कुटुंबियांना देत आहात का? लस तुटवड्यामुळे नागरिकांचे जीव जात आहेत, मात्र फडणवीस कुटुंब सुरक्षित आहेत असा सवाल ऐकाने ट्विट करून विचारला आहे.

कोण आहे तन्मय फडणवीस
तन्मय फडणवीस हा माजी मंत्री शोभा फडणवीस यांचा नातू असून त्याचे वय २५ हून अधिक नसल्याचे सांगण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments