संभाव्य धोका लक्षात घेऊन गृह मंत्रालयाकडून अदार पुनावाला यांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा!

Impossible to complete corona vaccination in 2-3 months: Adar Poonawala
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

दिल्ली : लस उत्पादन करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटला भारतासह संपूर्ण जगभर महत्त्व प्राप्त झाले आहे. संपूर्ण जग कोरोनाशी लढत असताना सध्या लसीकरणाला अनन्यसाधारण महत्त्व दिले जात आहे. महाभयंकर कोरोना विषाणूला हरवण्यासाठी लसीकरण हाच सर्वोत्तम पर्याय ठरणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. याच अनुषंगाने या कंपनीचे सीईओ अदार पुनावाला यांच्या जीवालाही धोका संभवत आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन केंद्रीय गृह मंत्रालयाने पुनावाला यांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. पुनावाला यांची सुरक्षा वाढवण्याबाबत गृह मंत्रालयाने काल निर्णय घेतलाय.
पुनावाला यांची वाढती लोकप्रियता तसेच कोरोना लढ्यात कोविशिल्ड लसीला जगभरातून मिळत असलेला वाढता प्रतिसाद याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने पुनावाला यांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा पुरवली आहे.त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय राखीव पोलिस बल म्हणजेच सीआरपीएफवर सोपवण्यात आली आहे. पुनावाला यांच्यासोबत २४ तास ११ जवान तैनात राहणार आहेत. अदार पुनावाला हे देशात कुठेही गेले तरी त्यांच्या संरक्षणार्थ ‘वाय’ दर्जाचे सुरक्षा कवच तैनात असणार आहे.
सिरम इन्स्टिट्यूटने अलीकडेच कोविशिल्ड लसीचे नवीन दर जाहीर केले. या दरवाढीवरून पुनावाला यांच्यावर काही प्रमाणात टीकाही झाली. हेही सुरक्षा वाढवण्यामागील एक कारण असू शकतं असं म्हटलं जात आहे.

कोविशिल्ड लसीचे नवीन दर जाहीर
देशात कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी कालपासून नोंदणीला सुरुवात झाली आहे. लस उत्पादक कंपन्यांनी कोरोना लसीच्या किमती कमी कराव्यात, अशी विचारणा केंद्र सरकारनं सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकला केली होती. कोविशील्ड लसीच्या किमती राज्य सरकारांसाठी १०० रुपयांनी कमी करत आहोत, अशी माहिती सीरमचे प्रमुख आदर पुनावाला यांनी दिली आहे. आदर पुनावाला यांनी ही माहिती ट्विटद्वारे दिली.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *