गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दर महिन्याला १०० कोटी गोळा करण्यास सांगितले होते.
परमबीर सिंह, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावरखळबळजनक आरोप केले आहेत.
अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना प्रत्येक महिन्याला १०० कोटी वसूल करण्याचे टार्गेट दिले दिले होते असा आरोप परमबीर सिंह यांनी केला आहे. हे टार्गेट मुंबईतील बर, हॉटेल चालका कडून वसूल करावे अशे सांगितले असल्याचे पत्रात लिहिले आहे.
अनिल देशमुख यांनी आरोप फेटाळले
मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी प्रकरणी सचिन वाझे यांचा सहभाग स्पष्ट होत असतांना व त्यांचे धागेदोरे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून हो असतांना परमबीर सिंग यांनी स्वतःला वाचविण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे.