शाहरुख खानविषयी आता ‘ही’ नवीन माहिती समोर

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई: ‘पठाण’ सिनेमा आणि शाहरुख खानविषयी आता एक नवीन माहिती समोर आली आहे, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटेल. शाहरुख खानने या सिनेमासाठी घेतलेल्या फीविषयी ही माहिती आहे. असं म्हटलं जातय की, शाहरुख खानने ‘पठाण’मध्ये काम करण्यासाठी खूप जास्त फी आकारली आहे. या फीमुळे तो बॉलिवूडचा सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता ठरला आहे.

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान  दोन कारणांमुळे बराच चर्चेत आहे. पहिली चर्चा म्हणजे अजय देवगनची एक जाहिरात. या जाहिरातीमध्ये तो ट्रोलही झाला आणि दुसरं कारण म्हणजे त्याचा आगामी ‘पठाण’ हा सिनेमा. शाहरुख या सिनेमाचं चित्रीकरण करत असून त्याचे अनेक अ‍ॅक्शन सीनचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. याशिवाय दररोज या सिनेमा संबंधित नव नविन माहिती समोर येत असते.

फीच्या बाबतीत त्यानं अक्षय कुमारला मागे टाकलं आहे. अलीकडेच अनेक ट्विटर युजर्सनी असा दावा केला आहे की, शाहरुख खानने ‘पठाण’मध्ये काम करण्यासाठी १०० कोटी फी घेतली आहे. बॉलिवूडचा कोणताच अभिनेता इतकी फी घेत नाही. एका वृत्तानुसार शाहरुख खानची ही फी अक्षय कुमार आणि सलमान खानसारख्या बड्या कलाकारांपेक्षाही जास्त आहे. मात्र, शाहरुख खानच्या फीसंदर्भात सिनेमाच्या निर्मात्यांनी किंवा कलाकारांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाहीये. शाहरुख खान या सिनेमासाठी खूप मेहनत घेत आहे. या सिनेमांत त्याचे अनेक धोकादायक स्टंट केले आहेत.

दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शाहरुख खान बुर्ज खलिफासमोर एक धोकादायक अ‍ॅक्शन सीन शूट करत असल्याचं दिसत आहे. शाहरुख खानशिवाय दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यात सिनेमात सलमान खानचे काही सीन असतील.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *