लाॅकडाऊन बाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं मोठ वक्त्यव; म्हणाले..

मुंबई : राज्यात कोरोना बधितानांची संख्या चिंता वाढविणारी आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व पक्षीय नेत्याची बैठक बोलाविली होती. त्यात त्यांनी लॉकडाऊनचे स्पष्ट संकेत दिले होते. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सुद्धा लॉकडाऊन बाबत मोठे विधान केले आहे. येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठक घेवून लाॅकडाऊनचा निर्णय घेणार असल्याची महत्वाची राजेश टोपे यांनी दिली. आणि हा लाॅकडाऊन लागला तर तो कमीत कमी पंधरा दिवसांचा असेल अशीही माहिती टोपे यांनी दिलीये.
त्याचबरोबर राज्यात रेमडेसीवर इंजेक्शनवर नियंत्रणासाठी एका कमिटीची स्थापना केली असून खाजगी रुग्णालयांना आता रेमडेसीवर इंजेक्शन जिल्हाधिकारी कार्यालयातूनच घ्यावं लागणार असल्याचं टोपे यांनी यांनी सांगितले.
राज्यात आतापर्यंत एक कोटी नागरिकांचं लसीकरण हे पूर्ण झालं असून केंद्र आणि राज्यात कोणताही संघर्ष नाही फक्त केंद्रानं लस पुरवठ्याची गती वाढवावी अशी विनंती राज्यानं केंद्राला केली असल्याची माहिती टोपे यांनी दिली