“नोकरीसाठी महाराष्ट्रात यायचं, जाताना महाराष्ट्रालाच बदनाम करून जायचं
पुणे: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्ब नंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टिका करण्यात येत आहे. यात आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी उडी घेतली आली. ट्वीट करून त्यांनी परमबीर सिंह यांच्यावर चांगलीच टिका केली आहे. त्यात त्यांनी “नोकरीसाठी महाराष्ट्रात यायचं, राज्याची नोकरी करतानाच विरोधीपक्षाची चाकरी करायची, अमाप संपत्ती कमवायची आणि शेवट जाताना महाराष्ट्रालाच बदनाम करून जायचं” अस कस चालेल अशी टिका त्यांनी केली आहे.
रुपाली चाकणकर यांनी गुरुवारी एक ट्वीट केले आहे. #pramabirExposed या हॅशटॅग खाली केलेल्या ट्वीट खाली परमबीर सिंह यांच्या संपत्तीचा लेखा झोखा मांडला आहे. मुंबईत परमबीर सिंह यांचे २ कोटी किमतीचे २ फ्लॅट असल्याचे तर हरियाणात त्यांच्या गावी ४ कोटी रुपयांचे घर असल्याचा दावा चाकणकर यांनी केला.तर परमबीर सिंह यांच्या पत्नीच्या नावे मुंबईत आणि हरियाणात कोट्यावधीची मालमत्ता आहे.
नोकरीसाठी महाराष्ट्रात यायचं, राज्याची नोकरी करतानाच विरोधीपक्षाची चाकरी करायची, अमाप संपत्ती कमवायची आणि शेवट जाताना महाराष्ट्रालाच बदनाम करून जायचं.
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) March 25, 2021
अस कसं चालेल? #ParambirExposed@NCPspeaks @TV9Marathi @abpmajhatv @MiLOKMAT @zee24taasnews @MaxMaharashtra @mataonline @saamTV pic.twitter.com/32FRmxurr2
अंधेरीतील वसुंधरा सोसायटीत २००३ साली परमबीर सिंह यांनी ४८.७५ लाखाचा फ्लॅट घेतला होता. नेरळ मधील शागुफा सोसायटीत ३ कोटी ६० लाख रुपयांचा एक फ्लॅट घेतला असल्याचा आरोप चाकणकर यांनी केला. तसेच परमबीर सिंह यांनी २०१९ मध्ये १४ लाखांची जमीन खरेदी केली असून हरियाणातील घराची किमंत ४ कोटी असल्याचा आरोप चाकणकर यांनी केला आहे.