हरिवंशराय बच्चन यांनी हिंदी भाषेच्या प्रेमापोटी नेहरुंशी घातला होता वाद..

the Harivansh Rai Bachchan had an argument with Nehru over his love of Hindi language.
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

हरिवंश राय बच्चन हे हिंदी भाषेतील एक प्रसिद्ध कवी आणि लेखक होऊन गेले. ते आपल्या लाडक्या अभिनेत्याचे म्हणजेच अमिताभ बच्चनचे वडिल होते. हरिवंशराय बच्चन यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९०७ मध्ये उत्तर प्रदेश मधील प्रतापगढ जिल्ह्यामधील बाबुपट्टी गावात झाला होता. त्यांचे एम.ए.पर्यंतचे शिक्षण अलाहाबाद येथे झाले. त्यानंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून पीएच.डी. मिळवली, व ते अलाहाबाद विश्वविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक झाले. निवृत्तीनंतर ते भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयात हिंदी विशेषज्ञ म्हणून नोकरी केली. ते राज्यसभेच्या १२ नामनिर्देशित सदस्यांपैकी एक होते.

हरिवंश राय बच्चन यांना हिंदी आणि उर्दू भाषेचा मेळ घालणे चुकीचे वाटायचे. ते नेहमी म्हणायचे की, हिंदी भाषेच्या तळाशी जाताना संस्कृत चा ही संबंध येतो आणि उर्दूच्या खोलाशी गेल्यावर अरब आणि फारसी भाषेचा प्रत्यय येतो. त्यामुळे ते म्हणायचे की हिंदी आणि उर्दू ला एकमेकांत मिसळणे योग्य नाहीं. एकदा तर त्यांनी हिंदी -उर्दू च्या विषयावर पंडित नेहरुंसोबत देखील वाद केला होता त्यात नेहेरू बऱ्यापैकी हरिवंशराय यांच्यावर नाराज झाले होते.

इलाहाबाद यूनिवर्सिटी मध्ये इंग्रजी विषयाचे प्राध्यापक डॉ. हरिवंश राय बच्चन नोकरी करण्याच्या आधी जास्त पगार मिळतोय म्हणून आकाशवाणीच्या ईलाहाबाद केंद्रामध्ये प्रोड्यूसर म्हणून काम करत होते. त्यानंतर त्यांना भारत सरकार सोबत परराष्ट्र विभागात हिंदी विभागामध्ये सचिव म्हणून काम करण्याची संधी चालून आली. आणि ते मोठ्या उत्साहाने ते दिल्लीला आले. परंतु ते काम करताना त्यांना त्या कामात आनंद वाटत नव्हता. त्यांना त्यांचे भाषांतराचे काम रटाळवाने वाटायचे. त्यांना असे वाटायचे की, फक्त भाषांतराचे / अनुवादाचेच काम करायचे होते तर आत्तापर्यंत घेतलेले उच्च शिक्षण काय कामाचे. मात्र त्यांना नोकरी करण्याची मजबुरी होती. जोपर्यंत दुसरीकडे नोकरीची संधी भेटणार नव्हती तोपर्यंत त्यांनी हे काम चालूच ठेवले.

त्यांनी अनुवादित केलेले लेख, भाषणे हे तत्कालीन प्रधानमंत्री पंडित नेहरू यांच्यासाठी असायचे. जेव्हा केव्हा इतर देशाचे राष्ट्राध्यक्ष भारतामध्ये दौऱ्यासाठी यायचे तेव्हा त्यांचे भाषण आणि त्यांनी केलेली वक्तव्य हे भारतीय नागरिकांसाठी हिंदीमध्ये वाचली जायची. त्याचे अनुवाद/भाषांतर करण्याची जबाबदारी ही हरिवंशराय बच्चन यांची असायची. त्यावेळेला बजेट सत्राच्या सुरुवातीला देशाचे राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभेला संयुक्त सदनामध्ये संबोधित करण्याची परंपरा होती. जर राष्ट्रपतींनी हिंदी भाषेमध्ये भाषण दिले तर उपराष्ट्रपती त्याच भाषणाला इंग्रजी भाषेमध्ये वाचायचे. आणि जर राष्ट्रपतींनी इंग्रजीमध्ये भाषण दिले तर तेच भाषण उपराष्ट्रपती हिंदी मध्ये वाचायचे.

तेव्हा देशाचे राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन होते, ते मोठे विद्वान व्यक्ती होते. नेहमीप्रमाणे त्यांचे भाषण पंतप्रधान कार्यालयातून जात असायचे. मात्र राधाकृष्णन हे पीएम ऑफिसमधून आलेल्या भाषणांमध्ये स्वतःच्या खास पद्धतीने अनेक बदल करायचे. सदनामध्ये त्यांच्याशिवाय उच्चप्रतीची इंग्रजीमध्ये  लिहिणारं कुणीही नव्हतं आणि याची सर्वांनाच कल्पना असायची. राष्ट्रपती आपल्या निश्चित झालेल्या भाषणाची एक प्रत अनुवादासाठी हरिवंश राय बच्चन यांच्याकडे पाठवायचे.

हरिवंशराय बच्चन हे राधाकृष्णन यांचे मोठे प्रशंसक होते. अनुवादित भाषणाची गरिमा राखली जावी असा विचार करून त्यांनी, अनुवादित भाषणांमध्ये हिंदी भाषेतील काही अतिशय चांगल्या आणि मोठ्या मोठ्या  शब्दांचा वापर केला. त्यानंतर त्यांना रात्री नऊ वाजेच्या सुमारास निरोप आला की प्रधानमंत्री बच्चन यांची मूर्ती भवन मध्ये प्रतीक्षा करीत आहेत. बच्चन त्यांना भेटण्यास पोहचले. पंडित नेहरू यांनी बच्चन यांना, ‘अनुवाद तर तुम्ही अतिशय चांगला केला आहे, मात्र शुद्ध हिंदी भाषेमध्ये तुम्ही बरेच फेरबदल केले आहेत, त्यामुळे ते वाचनं खूप कठीण होऊन बसलं आहे.

त्यावर हरिवंशराय बच्चन यांनी उत्तर दिले कि, ”पंडितजी, शेवटी ते राधाकृष्णन यांचे भाषण आहे आणि त्यांची अस्खलित इंग्रजी भाषा आपण जाणतोच, त्यामुळे त्यांच्या इंग्रजीला तोडीस तोड म्हणून मला हिंदी भाषेतील अनुरूप शब्द अनुवादामध्ये टाकायचे होते’. नेहरूंनी यांना प्रत्युत्तर दिले की, ‘तुम्हाला माहिती आहे का, या अनुवादित भाषणाला वाचणार कोण, तर डॉ. झाकीर हुसैन. त्यांना हिंदीमधील हे अवघड शब्दांचे उच्चारण करायला कठीण जाईल.’ झाकीर हुसेन हे तत्कालीन उपराष्ट्रपती होते. बच्चन यांना नेहरूंनी दिलेले उत्तर पटले नाही.

हरिवंश राय बच्चन हे पंडित नेहरू यांना असे म्हणाले की, “पंडित नेहरू, एखाद्या व्यक्तीच्या उच्चारण सुविधेसाठी आपण भाषेमध्ये बदल करू शकत नाही, त्यामुळे हवं तर तुम्ही त्या भाषेचा अनुवाद उर्दूमध्ये का नाही करून घेत? ” हे ऐकून नेहरूजींचा चेहरा मात्र रागाने लाल झाला आणि ते संतापाने आपल्या खुर्चीवरून उठले आणि म्हणाले की, “देअर इज एनफ ट्रबल इन धिस कन्ट्री’, जरी त्या भाषणाचा अनुवाद उर्दूमध्ये केला तरी देखील त्या अनुवादाला हिंदीच बोललं जाईल. असाही काय फरक आहे उर्दू आणि हिंदी मध्ये? यावर मात्र बच्चन एकदम निरुत्तर झाले. नेहरूजींचा संताप बघून त्यांना पुढे काय बोलावं सुचेनाच, ही अडचण नेहरूजींनी ओळखली आणि शांत होत बच्चन यांना दिलासा दिला की, ‘ मला माहितीये तुम्हाला उर्दू फार चांगली येत नाही, मिस्टर पुरी नावाचे रेडिओ केंद्रात एक उर्दू रीडर आहेत. त्यांना तुमच्या मदतीला पाठवून देतो. भाषणामध्ये जिथे जिथे हिंदी अवघड शब्द आलेले आहेत तिथे तिथे त्यांच्या मदतीने उर्दू मधील सोपे शब्द समाविष्ट करा. हे काम आजच्या रात्रभरात पूर्ण झाले पाहिजे, कारण उद्या सकाळी ११ वाजता हे भाषण वाचले जाणार आहे”.  नेहरू यांनी सांगितल्याप्रमाणे मिस्टर पुरी आणि हरिवंश राय बच्चन या दोघांनी मिळून भाषणाला यशस्वीरित्या अनुवादित केलं.

हरिवंश राय बच्चन यांची एक प्रसिद्ध कविता आपण शाळेत असताना हिंदी पाठ्यपुस्तकात वाचलीये,

जीवन में एक सितारा था,माना वह बेहद प्यारा था,

वह डूब गया तो डूब गया,अम्बर के आनन को देखो,

कितने इसके तारे टूटे, कितने इसके प्यारे छूटे,

जो छूट गए फिर कहाँ मिले पर बोलो टूटे तारों पर,

कब अम्बर शोक मनाता है, जो बीत गई सो बात गई | हिंदी भाषेच्या प्रेमापोटी बच्चन यांनी नेहरुंशी वाद घातला होता.त्यांनतर बरेचदा त्यांना आपण देशाच्या पंतप्रधानांना अशा शब्दात बोलल्याचं वाईटदेखील वाटलं होतं. अनुवादन केलेल्या त्या भाषणानंतर मात्र हरिवंश राय बच्चन यांचे कविमन हिंदी आणि उर्दू भाषेच्या मिश्रण बघून नाराज झाले होते.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *