मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई, दि. 16 :- बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन. या निमित्तानं बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी राज्यातल्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक शिवाजी पार्कवर पोहोचत असतात.

आजच्या दिवशी शिवाजी पार्कवर राजकीय मंडळींची रेलचेल पाहायला मिळत असते. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवाजी पार्कवर जात बाळासाहेबांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, खासदार सर्वश्री गजानन कीर्तिकर, राहुल शेवाळे, खासदार भावना गवळी, आमदार सर्वश्री भरत गोगावले, सदा सरवणकर, प्रताप सरनाईक, कालिदास कोळंबकर, माजी मंत्री रामदास कदम, विजय शिवतारे, माजी खासदार आनंदराव अडसूळ उपस्थित होते.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *