मोठा दिलासा : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मंदावली, दिवसभरात ५९ हजार ५०० रुग्ण ‘कोरोनामुक्त’

मुंबई : राज्यात कोरोना थैमान सुरु असताना आज दिलासादायक बातमी समोर येत आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसून येत आहे. आज दिवसभरात 48 हजार 621 नवीन कोरोना रुग्णांची भर झाली आहे. तसेच 59 हजार 600 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून या रुग्णांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आहे. दरम्यान 567 कोरोना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्रात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.07 टक्के आहे. राज्यात आतापर्यंत 40 लाख 41 हजार 158 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून मोठ्या संख्येने रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. कोरोनामुळे उपचारादरम्यान 70 हजार 851 रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 1.49 टक्के आहे.
राज्यात 6 लाख 56 हजार 870 अॅक्टीव्ह रुग्ण असून त्यांच्यावर खासगी व शासकीय रुग्णालयात उपचार पद्धती चालू आहेत. अशी माहिती आरोग्य विभागकडून देण्यात आली आहे. पुणे, मुंबई, नागपूर, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद राज्यातील अशा मोठ्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे.