गाळे विक्रीतून अहमदनगर मधील ‘ही’ ग्रामपंचायत बनली कोट्याधीश
अहमदनगर : जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात वांबोरी ही सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. बाजारपेठेच्या दृष्टीने जिल्ह्यासाठी वांबोरी हि ग्रामपंचायत खूप महत्वाची आहे. नुकतेच वांबोरी मध्ये मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कामाचे उद्घाटन झाले होते. हे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. विविध प्रकारच्या कामांमधून वांबोरी ग्रामपंचायत ही कायमच चर्चेत असते. महाराष्ट्रात ग्रामपंचायतीला पण चांगल्या प्रकारे महसूल देण्याचे काम सरकारच्या वतीने होत असते पण गाळे विक्रीच्या माध्यमातून एखादी ग्रामपंचायत कोट्याधीश झाल्याचे प्रथमतः दिसून आपले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील वांबोरी ग्रामपंचायत गाळे विक्रीतून कोट्याधीश झाली आहे. वांबोरी गावातील ग्रामपंचायतीला गाळे विक्रीतून तब्बल ११ कोटी ६५ लाख ११ हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे. वांबोरी गावात ग्रामपंचायतीचे १० गाळे आहेत. त्यांच्या विक्रीतून ग्रामपंचायत कोट्याधीश झाली आहे. गेल्या २ वर्षांपूर्वी या ग्रामपंचायतीच्या गाळ्यांचे काम नेते सुभाष पाटील आणि तनपुरे साखर कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले. या गाळ्यांच्या बांधकामासाठी ७५ लाखांचे कर्ज पण उपलब्ध करून देण्यात आले होते.
त्यासाठी जिल्हा परिषद सदस्य शशिकलाताई पाटील यांनी विशेष प्रयत्न केले होते. गाळे बांधकामासाठी ग्रामपंचायत फंडातून पण जवळपास सत्तावीस लाख रुपयांची मदत देण्यात आली. गाळे खरेदी करण्यासाठी अनामत रक्कम म्हणून २५ हजार रुपये ठेवण्यात आले. यावेळी गाळे खरेदीला सर्वात जास्त बोली १९ लाख ५० हजार रुपयांची लागली.
कोरोना काळात ग्रामपंचायतीने केले होते भाडे माफ
कोरोना काळात नेते सुभाष पाटील व तनपुरे कारखान्याचे माजी अध्यक्ष उदयसिंह पाटील यांच्या सूचनेवरून ग्रामपंचायतीने बाजारपेठेतील १०७ गाळेधारक व गाळेधारक व ४५ टपरी धारकांना चार महिन्यांचे साडेचार लाख रुपये भाडे पूर्ण माफ केले गेले गेले होते. त्यामुळे, व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला होता. वांबोरीची बाजारपेठ ब्रिटिश काळापासून नावलौकिक प्राप्त आहे. बाजारपेठेत मोठी उलाढाल असते.