‘राज्यपाल थर्डक्लास आहेत, त्यांना खाली खेचून लांब फेकून दिलं पाहिजे’

उदयनराजे भोसले
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका वक्तव्यामुळे रणकंदन माजलं असतानाच भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानं मोठा वाद उफाळून आला आहे.

समस्त शिवप्रेमींकडून कोश्यारी व त्रिवेदी यांचा निषेध करण्यात येत असून संताप व्यक्त केला जातोय.

दरम्यान, शिवाजी महाराजांचे वंशज राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी या प्रकरणावर भाष्य केलं असून राज्यपालांची आता हकालपट्टी करावी’, अशी मागणी त्यांनी केली.

ते म्हणाले, विकृतीला कुठलाही पक्ष नसतो, कुठलीही जात नसते. अशा विकृत लोकांना पक्षांनी फेकून दिलं पाहिजे. राज्यपालांना तर अगोदर खाली खेचून कुठेतरी लांब फेकून दिले पाहिजे. याबाबत लवकरच मी माझी पुढची वाटचाल ठरवणार आहे.

”राज्यपाल थर्डक्लास आहेत”

ते म्हणाले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राजभवनातून बाहेर काढलं पाहिजे. ते खूप दिवसांपासून त्या घरात बसून आहेत. त्यांची तिथं बसण्याची लायकी नाही. ते काहीही बोलत आहेत. राज्यपाल थर्डक्लास आहेत.

राज्यपालांची आता हकालपट्टी करावी. त्यांचं वय झालंय. त्यांना आपण काय बोलत आहोत, हे समजत नाही. त्यांना विस्मरण होतंय. त्यांना वृद्धाश्रमात पाठवा.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *