|

कर्णधारपद मिळालं आणि भारत एका महान फलंदाजाला मुकला…

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

जाणून घ्या पद्मश्री किताब मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय क्रिकेटपटू बद्दल

महान क्रिकेटपटू विजय हजारे यांचा आज जन्मदिन! विजय हजारे यांचा जन्म सांगलीतील एका मराठी कुटुंबात ११ मार्च १९१५ रोजी झाला. त्यांचे वडील शिक्षक होते. विजय यांना पकडून एकूण आठ भावांपैकी ते एक होते. हजारे यांचे क्रिकेट मध्ये आगमन होत असताना, त्यांना हिंदू जिमखान्याकडून क्रिकेट खेळण्यासाठी प्रस्ताव आला होता. सुरुवातीला त्यांनी तो प्रस्ताव नाकारला होता. पण, त्यावेळचे क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष डी’ मेलो यांनी त्यांची समजूत काढली आणि मग विजय हजारे हे प्रथमश्रेणी क्रिकेट खेळले.

भारतीय क्रिकेट मधील अनेक विक्रमांचे प्रणेते असलेल्या हजारेंनी कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटीत शतक झळकावण्याचा मानही पहिल्यांदा मिळवला. विजय हजारे यांच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला कसोटी विजय मिळवला तेंव्हा विजय मिळवल्यानंतरही ते आपल्या सहकारी खेळाडूंना फक्त ‘शाब्बास’ म्हणाले हजारे हे स्वभावाने मितभाषी असल्यामुळे एवढंच बोलले असावेत. ते एक शांत स्वभावाचे व्यक्ति होते, ज्याला कशाबद्दलही उत्सुकता नव्हती परंतु एकदा का मैदानात उतरले कि ते दमदारपणे खेळी करायचे. पण निश्चितपणे भारताने निर्माण केलेल्या सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंपैकी एक आहे.”

त्यांचे एक वैशिष्टय म्हणजे विजय हजारे हे उजव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करत असायचे. प्रथमश्रेणी क्रिकेट मध्ये त्यांनी एकूण २३८ सामने खेळले. यामध्ये त्यांनी ५८.३८ च्या सरासरीने १८७४० धावां काढत विक्रम रचला. त्यानंतर या प्रथमश्रेणी क्रिकेट मधील हा धावांचा विक्रम प्रथम सुनील गावसकर आणि नंतर सचिन तेंडुलकर यांनी मोडला. प्रथमश्रेणीत त्रिशतक करणारे हजारे हे पहिले भारतीय होते. त्यांनी ‘द हिंदूज’ विरुद्ध १९४३-१९४४ मध्ये ३०९ धावा ठोकल्या होत्या. यामध्ये त्यांची सर्वोच्च धावसंख्या नाबाद ३१६ आहे. अशाप्रकारे त्यांनी प्रथमश्रेणी सामन्यात दोन त्रिशतके झळकावली.

प्रथमश्रेणीत ६० शतके आणि सलग तीन कसोटींमध्ये शतक नोंदवणारे ते पहिले भारतीय होते. त्यांनी गुल मोहंमद यांच्यासमवेत १९४७ मध्ये ५७७ धावांची भागीदारी केली होती. ती भागीदारी २००६ मध्ये श्रीलंकेच्या कुमार संघकारा आणि महेला जयवर्धने यांनी साउथ आफ्रिकेविरुद्ध ६२४ धावा करून मोडली. प्रथम श्रेणीत त्रिशतक करणारे हजारे हे पहिले भारतीय होते. त्यांनी ‘द हिंदूज’ विरुद्ध १९४३-१९४४ मध्ये ३०९ धावा ठोकल्या होत्या. यामध्ये त्यांची सर्वोच्च धावसंख्या नाबाद ३१६ आहे. अशाप्रकारे त्यांनी प्रथमश्रेणी सामन्यात दोन त्रिशतके झळकावली.

तसेच क्रिकेट रसिकांसाठी विजय हजारे हे मधल्या फळीतील अप्रतिम फलंदाज होते. कर्णधार नसताना हजारे यांनी अनेक प्रशंसनीय खेळ्या केल्या. यामध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात १९४७-४८ मध्ये एडिलेड कसोटीत दोन्ही डावात झळकावलेल्या शतकांचा समावेश आहे. कसोटी क्रिकेट खेळत असताना विजय हजारे यांनी ३० कसोटींमध्ये ४७.६५ च्या सरासरीने २१९२ धावा केल्या. यामध्ये त्यांची नाबाद १६४ ही सर्वोच्च धावसंख्या आहे. कसोटीमध्ये गोलंदाजी करताना त्यांनी ६१ च्या सरासरीने २० बळी घेतले. यामध्ये त्यांची ४/२९ ही सर्वोत्तम गोलंदाजी आहे. महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांची विकेट त्यांनी तब्बल तीनदा घेतली. त्यामुळेच कदाचित ब्रॅडमन हे हजारेंच्या मध्यमगती गोलंदाजी समोर खूप सावधानता बाळगायचे. ब्रॅडमन यांच्यासाठी हजारे धोकादायक गोलंदाज होते.

१९५१ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या मायदेशातील मालिकेसाठी हजारेंकडे कर्णधारपद सोपवण्यात आले. त्यांनी दिल्लीतील पहिल्या कसोटी सामन्यामध्ये नाबाद १६४ धावांची दमदार खेळी केली. ही धावसंख्या त्यावेळी भारताकडून नोंदवलेली सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या होती. स्वतःचा विक्रम होण्यासाठी हजारेंनी डाव घोषित केला नाही, असाही आरोप त्यावेळेस त्यांच्यावर झाला. परंतु, मुंबई मधील दुसऱ्या कसोटीतही त्यांनी १५५ धावांची धुंवाधार खेळी केली.

कसोटी क्रिकेटमधील विजय हजारे यांची कामगिरी पाहता त्यांचा सर्वोत्तम फलंदाजात समावेश होतो. मात्र नेतृत्व केलेल्या १४ पैकी  १२ कसोटीत त्यांना धावांसाठी झगडावं लागलं. त्या १२ कसोटी सामन्यात त्यांनी २४.४२ च्या सरासरीने ५५५ धावाच केल्या. तेव्हापासून कर्णधार पदाचे दडपण त्यांच्या कामगिरीवर परिणाम पाडत असल्याचे क्रिकेट पंडितांचे म्हणणे होते. त्यांना आद्य भारतीय विक्रमादित्य असेच म्हणावे लागेल.  सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर यांच्या पूर्वी भारतीय क्रिकेट मध्ये अनेक विक्रम करणारे हजारे हे पहिले भारतीय होते. विजय हजारे यांच्याबद्दल महान क्रिकेटर, सर डोनाल्ड ब्रॅडमन सांगतात, “विजय हजारे जर कर्णधार झाले नसते तर त्यांची गणना जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाजांमध्ये केली गेली असती.” तर क्रिकेटर विजय मर्चंट सांगतात, “कर्णधार पदाने विजय हजारेंना महान फलंदाज होऊ दिले नाही. ही  भारतीय क्रिकेटची शोकांतिका होती. “पद्मश्री किताब मिळवणारे पहिले भारतीय क्रिकेटपटू विजय हजारे यांना आतड्यांसंबंधी कर्करोगाने ग्रासले होते. त्यातच त्यांचे या दीर्घ आजारानंतर १८ डिसेंबर २००४ रोजी वडोदरा येथे त्यांचे दुःखद निधन झाले.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *