शिवभोजन थाळी वरून गोपीचंद पडळकर यांचा सरकारला चिमटा; शेअर केला एक व्हिडिओ

पुणे: भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे आपल्या आंदोलनाची स्टाईल, भाषण यामुळे नेहमीच चर्चेत राहतात. शनिवारी गोपीचंद पडळकर यांनी १५ एप्रिल पासून सुरू करण्यात आलेल्या मोफत शिवभोजन थाळी वरून ‘मामु समझा नही’…म्हणत ट्विटर वर एक व्हिडिओ शेअर करत राज्य सरकारला चिमटा काढला आहे.
यापूर्वी आमदार गोपीचंद पडळकर यांनी लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ‘कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?’ असा खोचक सवाल करत, लॅाकडाऊनविषयी जनतेत भिती पसरवू नये, अशी टिका केली होती.
शनिवारी आमदार गोपीचंद पडळकर यांनी
‘मामु समझा नही’…म्हणत मोफत सुरू करण्यात आलेल्या शिवभोजन थाळीवरून प्रश्न उपस्थित केले आहेत. संचारबंदी शिवभोजन थाळी… डाव गंडला वाटत? संचारबंदी नागरिकांनी शिवभोजन थाळीसाठी रांगा लावायच्या? गरजूंना घरा बाहेर पडू दिलं जाणार नसेल तर शिवभोजन थाळीचां उपयोग काय? मामू शिवभोजन थाळी खानेका हैं लेकीन जानेका कैसे? असा प्रश्न व्हिडिओच्या माध्यमातून विचारला आहे.
‘माननीय मुख्यमंत्री (मा .मु.) कुछ समझ में नही आया… मामु शिवभोजन थाळी खानेका है..लेकीन जानेका कैसे?’#गोलमाल#शिवभोजन_थाळी#lockdown#बिघाडी_सरकार pic.twitter.com/jkHXVZyB8E
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) April 17, 2021