| |

खुशखबर! दिव्यांग शाळेतील शिक्षक-कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होणार

शाळा सुरु होणार ?
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई: राज्यातील दिव्यांग शाळेतील शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात याची घोषणा केली. या निर्णयाची अंमलबजावणी दोन महिन्यांच्या आत करणार असल्याचेही ते म्हणाले.

अधिवेशनानंतर पंधरा दिवसांच्या आत संबंधित विभागांसोबत बैठका घेऊन शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे वाढीव अनुदान, भत्ते याबरोबरच सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासंदर्भातील सर्व अडचणी दूर करून दोन महिन्यांच्या आत सातवा वेतन आयोग लागू करण्यात येईल, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत दिली.

दहावी पास झालेल्या बहुतांश दिव्यांग विद्यार्थ्यांना, विशेषतः कर्णबधिर विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी अडचणींना सामोरे जावे लागते, यावर राज्य शासन अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना विशेष ज्युनिअर कॉलेज उपलब्ध करून देणार का? असा सवाल आमदार कपिल पाटील यांनी उपस्थित केला. त्यावर “राज्य सरकार दिव्यांग विद्यार्थ्यांना विशेष ज्युनिअर कॉलेज उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक असून, याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मांडणार आहे,” असे धनंजय मुंडे म्हणाले.

दिव्यांग शाळा, शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांकडे कायम दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वेळोवेळी होत आलेला आहे. सातवा वेतन आयोगामुळे दिव्यांग शाळेत काम करणाऱ्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल असे सांगितले जात आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *