खुशखबर! यंदा समाधानकारक पाऊस पडणार

दिल्ली: कोरोनामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. यात शेतकऱ्यांना सुखावणारी बाब समोर आली आहे. यंदा देशात मान्सून सामान्य राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने पहिला मान्सून अंदाज जाहीर केला आहे. यंदा पाऊस ९६ टक्क्यांपासून १०४ टक्क्यांपर्यंत राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हवामान खात्याने जून ते सप्टेंबर महिन्या दरम्यान दीर्घकालीन पाऊस पडणार असल्याचा अंदाज आयएमडीने वर्तविला आहे.
याबाबत हवामान विभागाकडून एक परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. पॅसिफिक महासागर आणि हिंद महासागरात होणाऱ्या अनुकूल बदलामुळे भारतात समाधानकार पाऊस पडणार असल्याचे अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
नैऋत्य वाऱ्याच्या परिस्थिती नुसार हवामान विभागाकडून दिर्घकालावाधीसाठी दोन टप्प्यात सरासरी अंदाज वर्तविला जातो. यात एप्रिल महिन्यात एक आणि मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दुसरा अंदाज दर्शविला जातो. दुसरा अंदाज अधिक सविस्तर दर्शविला जातो. यात देशात मान्सूनचा प्रवास कसा राहील याबाबत सविस्तर माहिती देण्यात येते.
केंद्रीय हवामान विभागाकडून पावसाच प्रमाण सामान्य, कमी किवा जास्त हे ठरविण्याचे काही निकष आहेत. त्यानुसार सरासरीच्या ९० टक्क्यापेक्षा कमी पावसाच प्रमाण असेल तर ते प्रमाण कमी समजल जाते. ९० ते ९६ टक्के असेल तर सामान्य पेक्षा कामी समजले जाते. ९६ ते १०४ टक्के असेल तर सामान्य समजले जाते. १०४ ते ११० टक्के असेल तर सामन्यहून आधीक समजले जाते. ११० पेक्षा अधिक असेल तर अतिवृष्टी समजली जाते.