खुशखबर! राज्यात गेल्या दोन दिवसात कोरोनाबाधित कमी आणि कोरोनमुक्त जास्त!

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई : राज्यात करोनाचा उद्रेक कायम आहे. गेले काही दिवस सातत्याने ६० हजारांहून अधिक नवीन कोरोनाबाधित रुग्णांची दररोज भर पडत आहे. त्यात गेल्या दोन दिवसांत मोठ्या संख्येने रुग्ण करोनामुक्त झाल्याने ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा ७ लाखांच्या आत ठेवण्यात यश आलं आहे.
राज्यात काल ६६,८३६ नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. तर तब्बल ७४,०४५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कालपर्यंत बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा ३४,०४,७९२ वर पोहचला असल्यामुळे ही आकडेवारी दिलासादायक आहे. कारण यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट ८१.८१ टक्के झाला आहे.
कालपर्यंत राज्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ६,९१,८५१ इतकी होती. गेल्या काही दिवसांमध्ये असं पहिल्यांदाच घडलंय, जेव्हा नव्या बाधित रुग्णांच्या संख्येपेक्षा बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात काल दिवसभरात ७७३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

पुण्यातील कोरोना स्थिती
पुणे महापालिका हद्दीत सलग पाचव्या दिवशी नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येची आकडेवारी कोरोनामुक्त रुग्णसंख्येपेक्षा कमी नोंदवली गेली आहे. काल पुण्यात ५ हजार ६३४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ४ हजार ४६५ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पुण्यातील मृतांची संख्या चिंताजनक बनली आहे. पुण्यात काल दिवसभरात ५८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कालपर्यंत पुण्यात ५० हजार ३२५ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु होते.
कालच्या एकूण आकडेवारीनुसार पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या ३ लाख ९१ हजार ४९५ वर पोहोचली आहे. त्यातील ३ लाख ३४ हजार ७८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ६ हजार ३८८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *