राज्यपालांना महाराष्ट्रातून बाहेर काढा – संभाजी राजे

भगतसिंह कोश्यारी
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते. तर नितीन गडकरी हे सध्याचे आदर्श आहेत, असं विधान करून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नव्या वादाला आमंत्रण दिलंय.

सावित्रीबाई फुले यांच्यापासून मुंबई शहराबाबतच्या वक्तवव्यामुळे राज्यपालांवर सडकून टीका झाली होती. त्यामुळे राज्यपाल हटाव या मागणीनं जोर धरला होता.

दरम्यान, शिवाजी महाराजांच्या वक्तव्यामुळे राज्यपालांविरोधात संतापाची लाट उसळली असून त्यांना हटवण्याची मागणी सुरु झालीये.

माजी खासदार संभाजी छत्रपती यांनीही अशीच भूमिका मांडली. ‘राज्यपाल असं का बडतात मला माहीत नाही. त्यांना महाराष्ट्रातून पाठवून द्या, असं मी परवा सुद्धा म्हटलं होतं. मी पंतप्रधानांना हात जोडून विनंती करतो, प्लीज प्लीज अशी व्यक्ती महाराष्ट्रात नकोय आम्हाला. राज्यपालांना महाराष्ट्रातून बाहेर काढा’, असं संभाजी राजे म्हणाले.

शिवाजी महाराज असतील इतर महापुरुष असतील संत असतील यांच्याबाबत घाणेरडा विचार घेऊन राज्यपाल येऊच कसे शकतात? असा सवालही संभाजीराजेंनी केलाय.

काय आहे प्रकरण ??

औरंगाबादमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभ कार्यक्रमात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी उपस्थित होते. यावेळी कोश्यारी यांच्या हस्ते शरद पवार आणि नितीन गडकरी यांनी डीलिट पदवी देऊन गौरवण्यात आलं.

या समारंभात बोलताना कोश्यारींनी नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी केली.

त्यामुळे भगतसिंह कोश्यारी यांच्यावर चोहीकडून टीकास्त्र डागलं जातंय.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *