‘तेरा नाम लिया तुझे याद किया’ म्हणतोय जेनेलियाचा नवरा !

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई : रितेश-जेनेलियाचा एक क्युट व्हीडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होतोय चाहतेही त्याला पसंती दाखवताना दिसतायत. तसं रितेश आणि जेनेलिया कायमच एकमेकांवर किती प्रेम करतात, हे त्यांच्या सोशल मीडियावर त्यांनी टाकलेल्या पोस्टमधून दिसतंच असतं. त्यामुळेच जेनेलिया ऑफ कॅमेरा राहूनही लोकांच्या मनात आजही घर करून आहे.

नुकताच जेनेलियाने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हीडिओ पोस्ट केला आहे, जो तुम्हालाही वारंवार पाहिल्याशिवाय राहावणार नाही. एका आयफा पुरस्कार सोहळ्यादरम्यान रितेश देशमुख अभिनेत्री प्रीती झिंटाची गळाभेट घेताना आणि तिच्या हातावर किस करताना दिसतोय. पण समोरच उभी असलेल्या जेनेलियाच्या चेहऱ्यावरील हावभाव तुम्ही पाहिले, तर तुम्हालाही वाटेल की आता रितेशचं काही खरं नाही.

या व्हीडिओमध्ये जेनेलिया फेक स्माईल करतानाही दिसतेय. तसा हा व्हीडिओ जुना आहे आणि म्हणूनच अनेकांना उत्सुकता होती, की जेनेलिया घरी गेल्यावर रितेशला काय बरं बोलली असेल?

तर अखेर जेनेलियाने त्याचं मजेशीर उत्तर दिलं आहे. या जुन्या व्हीडिओसोबत नवा व्हीडिओ जोडून जेनेलिया रितेशला रट्टे देताना दिसतेय. या व्हीडिओमध्ये तेरा नाम लिया, तुझे याद किया असं गाणंही लावलंय, तर रितेशही बायकोसमोर हात जोडताना दिसतोय. हा फनी व्हिडीओ शेअर करत जेनेलियाने प्रीति जिंटाला क्यूट असं म्हटलं आहे. तसेच जेनेलियाने प्रीति जिंटाला टॅगदेखील केले आहे.

स्केटिंग करताना पडल्याने जेनेलियाचा हात फ्रॅक्चर झाला आहे. त्यामुळे रितेश जेनेलियाचे केस बांधतानाचाही एक क्युट व्हीडिओ जेनेलियाने शेअर केला होता.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *