“गली गली मे शोर है, चंद्रभानु गुप्ता चोर है”
उत्तर प्रदेशमधील राजकारण नेहमीच चर्चेत राहणारं असतं. तेथीलच एका अशा मुख्यमंत्र्यांचा किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ते म्हणजे १९६० मधील उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रभानु गुप्ता. वय वर्ष १७ असताना एक तरुण स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होतो आणि सीतापुर मध्ये रौलट कायद्याच्या विरोधात निदर्शने करतो. त्याकाळात ब्रिटिशांच्या विरोधात आवाज उठविणे म्हणजे तरुणपणाची एकूण खूण होती असं मानलं जायचं. अशाच प्रकारे चंद्रभानुने देखील पूर्णतः स्वातंत्र्यचळवळीत उडी मारली आणि दहा पेक्षा अधिक वेळेस जेलवारी देखील पूर्ण केली. पुढे जाऊन ते सक्रिय राजकारणात उतरले. उत्तरप्रदेश मध्ये त्यांच्या प्रतिमेचे इतके वजन होते की तेथील आमदार/नेते कोणतेही निर्णय घ्यायच्या वेळी नेहरूंच्या ही अगोदर चंद्रभानू गुप्तांना विचारण्यात यायचं. असंही म्हटलं जायचं पंडित नेहरू गुप्तांना फारसं पसंद करत नसायचे. त्याचाच परिणाम त्यांच्या मुख्यमंत्रीपदावर झाला होता, म्हणजेच त्यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते.
चंद्रभानु गुप्ता यांच्या राजकीय कारकिर्दीला १९२६ मध्ये सुरुवात झाली त्यांना त्या दरम्यान उत्तर प्रदेश चे प्रदेश काँग्रेस अँड ऑल इंडियन काँग्रेस कमिटीचे सदस्य म्हणून निवडण्यात आले होते. १९३७ मध्ये विधानसभा निवडणुकीत देखील ते उत्तरप्रदेशमधून निवडून आले. आणि १९६० मध्ये ते प्रथमतः आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर ते सलग तीन वेळेस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले. नेहरूंच्या निर्णया नुसार त्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता असे म्हणले जाते. परंतु नंतर १९६७ ला पुन्हा निवडणूक जिंकून आले आणि पुनश्च एकदा मुख्यमंत्री पदावर ते विराजमान झाले तेही अवघ्या १९ दिवसांसाठी, हो याचे कारण असे की चौधरी चरण सिंह यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत स्वतःचा पक्ष उभा केला आणि सरकार पडले आणि चरण सिंह मुख्यमंत्री बनले.
चंद्रभानु गुप्ता मुख्यमंत्रिपदावर होते तेव्हा त्यांच्याकडे व्यावहारिक व राजकीय पाठबळ मिळवण्यासाठी अनेक मोठे-मोठे उद्योगपती त्यांच्याकडे येत असत. यामुळे त्यांच्यावर असे आरोप होत असायचे की त्यांनी अनेक व्यवहार आणि तडजोडी करून अमाप संपत्ती कमावली आहे. या आरोपांना चंद्रभानू मात्र कधीच गांभीर्याने घ्यायचे नाहीं. उघड उघड ते स्वतःला ‘चोर’ म्हणायचे. “गली गली मे शोर है चंद्रभानु गुप्ता चोर है” असं म्हणून ते विरोधकांनाच खिजवायचे.
ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लागायचे मात्र ते त्यांच्या खासगी आयुष्यात खूप कंजूष स्वभावाचे होते. त्यांच्याकडे कुणी आर्थिक मदत मागायला गेल्यावर ते रागवायचे परंतु आलेल्या गरजूंना ते रिकामे हाताने पाठवत देखील नसायचे. डॉ. राम मनोहर लोहिया चे मुख्य सचिव नंदकिशोर यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांचाही असाच एका अनुभव होता. नंदकिशोर यांच्या मुलीचे लग्न ठरले होते तेव्हा त्यांची आर्थिक स्थिती कमकुवत होती. त्यांनी मित्र परिवारातून कसेबसे पैसे जमले परंतु तेही लग्नाच्या नियोजनासाठी मुबलक नव्हते. तेव्हा त्यांनी चंद्रभानु गुप्ता यांची भेट घेऊन मदत मागावी म्हणून त्यांना भेटायला गेले. पाच हजारांची मदत मागितली असताना चंद्रभानु गुप्ता यांच्यावर भडकले ” मी काय कुबेर आहे का? कुणीही येतं आणि मदत मागतात, माझ्याकडे काहीही नाही” हे ऐकून नंदकिशोर दुःखी होऊन परत निघाले, आणि कॉफी हाउस मध्ये येऊन बसले.
तेवढ्यात कॉफी हाऊस मध्ये तेव्हाचे आसामचे राज्यपाल व राज्यसभा खासदार प्रकाश मेहरोत्रा आले आणि नंदकिशोर यांच्या हातात ५००० रुपये आणि स्वतःच्या खिशातून अजून एक पाचशे रुपयाची नोट काढून दिली आणि सांगितले कि, तुम्ही भेटून गेल्यानंतर चंद्रभानु गुप्ताचे देखील नाराज होते कारण की ते तुम्हाला मदत करू शकले नाहीत, त्यांच्याकडे इतके परेशान आहे तिथे तुम्हाला देऊ शकतील.” तेव्हा मेहरोत्रा यांनीच इकडून तिकडून पैशांचा बंदोबस्त केला आणि ५००० रुपये नंदकिशोर यांना देऊ केले होते. चंद्रभानु गुप्ता यांच्या कामाच्या पद्धती देखील फेमस होत्या. ते नेहमी म्हणायचे की, ‘जे काही काम कराल ते अगदी हटके करा’. त्यांचे राजकीय व खाजगी आयुष्य हे विलक्षण होते. ते आयुष्यभर अविवाहित राहिले. त्यांना मित्र अगदी बोटांवर मोजण्या इतके होते तर शत्रू मात्र अगणित…अमाप संपत्ती जमा केल्याचा आरोप त्यांच्यावर अगदी शेवट पर्यंत झाला होता. त्यांना पक्षामधील ‘ब्रिलियंट स्ट्रॅटजीस्ट’ आणि ‘फंड रेजर’ मानलं जायचं. विरोधक नेहमी टीकेच्या भाषेत बोलायचे की चंद्रभानू हे काँग्रेसमध्ये पैसा आणणारे डीलर आहेत. पण त्यांच्या समर्थकांच्या म्हणण्यानुसार सध्याचे लखनऊ शहर हे त्यांच्याचमुळे इतके संपन्न आहे. भ्रष्टाचाराचे पैशांचा गैरव्यवहार राज्यांच्या नेत्यावर आरोप व्हायचे त्याच नेत्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या खात्यावर फक्त दहा हजार रुपयेच रक्कम आढळली होती आणि सगळ्यांनाच धक्का बसला होता.