Saturday, October 1, 2022
Homeब-बातम्यांचा१ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वांना मिळणार लस, कशी कराल नोंदणी ?

१ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वांना मिळणार लस, कशी कराल नोंदणी ?

पुणे: जानेवारी महिन्यापासून भारतात कोव्हिडसाठीच्या लसीकरणाला सुरुवात झाली आणि १ मार्चपासून ६० वर्षांवरील नागरिक आणि सहव्याधी असणारे ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येतेय. पण आता ४५ वर्षांवरील सर्वांनाच लस देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्यसेवा कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना लस देण्यात आली.

या लसीकरण मोहीमेसाठी को-विन नावाचा डिजीटल प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आलाय. हा प्लॅटफॉर्म लसीकरण मोहीम राबवणारी यंत्रणा, लस देणारी आरोग्य सेवा आणि लस घेणाऱ्या व्यक्ती या सगळ्यांना वापरता येतो. कोव्हिडच्या लसीकरण कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणेला मदत करणं हे या को-विन (Co-WIN) ॲपचं प्राथमिक उद्दिष्ट असल्याचं भारत सरकारने म्हटलंय. यासोबतच लस घेण्यासाठी या ॲपच्या किंवा को-विन वेबसाईटच्या माध्यमातून नोंदणी करता येते.

लस घेण्यासाठी कशी कराल नोंदणी ?

  • या Co-WIN ॲपच्या नावावरून काहीसा गोंधळ आहे. अधिकृत वेबसाईटवर कोविनचं पूर्ण नाव लिहीण्यात आलंय Co-WIN : Winning over COVID 19. पण भारतीय माध्यमांनी याला कोव्हिड व्हॅक्सन इंटेलिजन्स नेटवर्क असंही म्हटलंय.
  • तुम्ही पोर्टलवर रजिस्टर केलेला मोबाईल नंबर वापरून लॉगिन करा. तुम्हाला या नंबरवर एक OTP – वन टाईम पासवर्ड येईल. तो नंबर घातल्यानंतर तुम्हाला तुम्ही नोंदवलेल्या लोकांची नावं दिसायला लागतील.
  • या नावांसमोर असणाऱ्या कॅलेंडरच्या खुणेवर क्लिक करून तुम्ही अपॉईंटमेंट घ्यायची आहे.
  • या खुणेवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला राज्य निवडायचं आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा, त्यातलं शहर, वॉर्ड वा पिन कोड हे निवडा. यानंतर तुम्हाला तुमच्या जवळच्या लसीकरण केंद्रांची यादी दिसू लागेल.
  • यामध्ये सरकारी आणि खासगी अशा दोन्ही केंद्रांचा समावेश असेल.
  • जिथे पैसे भरून लस घ्यावी लागणार आहे, तिथे Paid असं लिहीलेलं असेल.
  • यातल्या एकेका केंद्रावर क्लिक करून तुम्ही तिथे कोणत्या तारखेचे स्लॉट उपलब्ध आहेत, हे तपासू शकता. त्यातला तुमच्या सोयीचा स्लॉट निवडा आणि नक्की करा.
  • या अपॉइंटमेंटच्या दिवशी लस घ्यायला जाताना तुम्ही ज्या ओळखपत्राच्या आधारे नोंद केलेली आहे, ते सोबत न्यायला विसरू नका.
  • लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर कधी येऊन दुसरा डोस घ्यायचा आहे, ते सांगणारा sms तुम्हाला येईल.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments