खुशखबर, १ मार्चपासून ६० वर्षांवरील नागरिकांना कोरोना लस मिळणार
दिल्ली: देशभरात वाढते कोरोनाचे रुग्ण ही चिंता वाढवणारी बाब आहे. मात्र कोरोना लसीकरणाबाबत केंद्र सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे. देशात १६ जानेवारी पासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात पोलीस आणि शिक्षक अश्या पद्धतीने लसीकरणाचा टप्पा पार पडला आहे. तिसऱ्या टप्प्याला १ मार्च पासून सुरवात होणार आहे. यात ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजर असलेले ४५ वर्षावरील नागरिकांना कोरोनाच्या लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.
या लसीकरणासाठी १० हजार सरकारी आणि २० हजार खासगी केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. सरकारी केंद्रावर ही लस मोफत देण्यात येणार आहे तर खासगी केंद्रावरील लस साठी पैसे मोजावे लागणार आहे. इथे देण्यात येणाऱ्या लशीसाठी किती पैसे मोजावे लागतील याबाबत उत्पादक आणि रुग्णालयाशी चर्चा करून आरोग्य मंत्रालय तीन ते चार दिवसात निर्णय घेईल असेही जावडेकर यांनी यावेळी सांगितले.
भारतात आता पर्यंत १ कोटी २४ लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यात ६४ लाख ९८ हजार ३०० आरोग्य कर्मचारी आहेत. १२ राज्य आणि ७५ टक्याहून अधिक केंद्रशासित राज्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे.