पुलवामा हल्ल्याचे ऋण फेडण्यासाठी पाकिस्तानला मोफत कोरोना लसीची भेट
कॉंग्रेस नेत्याचा आरोप
मुंबई: भारताचा शेजारी असणारा पाकिस्तान नेहमी सीमेवर कुरापती काढत असतो. भारतात दहशतवादी घुसविण्यासाठी मदत करणे, शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे, आंतरराष्ट्रीय राजकारणात भारत विरोधी भूमिका घेणे अशी अनेक काम पाकिस्तानकडून होत असतात. जगातील सर्व देश सध्या कोरोनाशी लढत आहेत. अश्या संकटाच्या काळात पाकिस्तानला भारताची मदत होणार आहे. भारतात तयार होणाऱ्या कोव्हीशील्ड लसीचे साडेचार कोटी डोज पाकिस्तानला देण्यात येणार आहे.
याबाबत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ट्वीट करून भाजप वर टिका केली आहे. “पाकिस्तान नॅशनल डे निमित्त पाकिस्तान ला मोदी कडून शुभेच्छा, पाकिस्तान ला मोफत कोरोना लस देण्यात येणार आहे. लोकसभा निवडणूक पूर्वी झालेल्या पुलवामा हल्ल्याचे ऋण फेडणे सुरू आहे भाजप वाल्यांकडून” असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
भाजप वालेच पाकिस्तान चे खरे शुभचिंतक . @INCMaharashtra @BJP4Maharashtra https://t.co/95eHToAOVd
— Office Of Vijay Wadettiwar (@VijaywaOfficial) March 24, 2021
तसेच भाजपवाले हे पाकिस्तानचे खरे शुभचिंतक असल्याचा आरोप सुद्धा मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार केला आहे.
या ट्वीट मध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना पत्र लिहून कोरोनाची लस पाठवत असल्याचे लिहिले आहे. पाकिस्तान नॅशनल डे निमित्त पाकिस्तान ला मोदी कडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.