Saturday, October 1, 2022
Homeब-बातम्यांचापंतप्रधान मोदींना माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे सुद्धा पत्र

पंतप्रधान मोदींना माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे सुद्धा पत्र

कोरोनासाठी दिले ‘हे’ महत्वाचे सल्ले

नवी दिल्ली : देशात कोरोनाची परिस्थिती अधिकच गंभीर होताना दिसून येत आहे. आरोग्य सुविधा आता अपुऱ्या पडू लागल्या आहेत. दरम्यान कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी सुद्धा पत्र लिहले असून काही सूचना केल्या आहेत. यामध्ये महत्वाची सूचना देवेगौडा यांनी सरकारला केली आहे ती म्हणजे सर्व नागरिकांना मोफत लस दिली जावी. असे केल्यास मानवतेच्या दृष्टीने हा एक चांगला संकेत असेल असे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे.

माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या पत्रात असलेले महत्वाचे मुद्दे –

 • लस घेण्यासाठी आलेल्या गरीब लोकांना आयडी कार्ड सारख्या समस्येतून मुक्त करायला हवे. इंटरनेट नसणे आणि सरकारी वेबसाइटची माहिती नसणे याचा त्यांच्या लसीकरणावर परिणाम होऊ नये.
 • आरोग्य प्रशासन आणि कोविड व्यवस्थापनाचे विकेंद्रीकरण करायला हवे. जिल्हा प्रशासनाच्या मदतीसाठी वैद्यकीय व्यावसायिकांना लहान करारावर नोकरी देण्याची गरज आहे.
 • सर्व जिल्हा मुख्यालयांत वॉर रुम बनविण्याची आवश्यकता.
 • पुढील सहा महिन्यांसाठी मोठ्या सामूहिक हालचालींवर बंदी घालण्याची आवश्यकता.
 • पुढील सहा महिन्यांसाठी राज्यात होणाऱ्या पोटनिवडणुका थांबवायला हव्यात.
 • खासगी आणि सरकारी क्षेत्रांत कोरोना सेंटर आणि आरोग्य केंद्रे वाढविण्याची गरज.
 • सध्या ग्रामीण भाग, तालुके आणि गावांत कोविड व्यवस्थापनाची तयारी करण्याची गरज लशीसंदर्भातील भ्रम दूर करण्याची आवश्यकता.
 • देशातील गरीब समुहांना डोळ्यासमोर ठेऊनच लशीची किंमत निश्चित करायला हवी. देशातील सर्व नागरिकांना मोफत लस देणे हा मानवतेच्या दृष्टीने चांगला संकेत असेल.
 • सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या गर्भवती महिलांना तीन महिन्यांची सुट्टी द्यायला हवी. तसेच वेतनही द्यायला हवे.
 • १२-१५ वर्षांच्या मुलांसाठीही व्हॅक्सीनेशन ट्रायल व्हायला हवे.
 • निवडून आलेल्या लोकप्रतिनिधिंनी, आपल्या मतदारसंघात पुरेशा लशी आहेत, की नाही याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. 
 • खासगी क्षेत्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांनाही आरोग्य विमा द्यायला हवा. छोटे नर्सिंग होम आणि ग्रामीण भागांत क्लिनिकवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही याची आवश्यकता आहे.
 • ज्या कोरोना योध्याचा या लढाईत मृत्यू झाला, त्याच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी द्यायला हवी.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments