माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण

दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
देशात कोरोना बाधित झपाट्याने वाढत आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत विक्रमी वाढत होत आहे. यामुळे देशातील आरोग्य यंत्रणेवर ताण येत असून लसीचा तुटवडा, ऑक्सिजनची कमतरता, रेमडेसिविरचा तुडवडा जाणवत आहे. बेड्सची संख्या अपुरी पडत आहे. या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते.
कोरोनाशी लढताना आपल्या लसीकरनाचा वेग वाढला पाहिजे. आपण किती लोकांना लस दिली हा आकडा बघण थांबवून पूर्णपणे किती टक्के लोकसंखेला लस दिली यावर लक्ष केंद्रित करायला हवे. लसीकरणसाठी किती ऑर्डर दिल्या गेले आहेत याची आकडेवारी जाहीर करावी अस मनमोहन सिंग यांनी पत्रात म्हंटले होते.