देशात पहिल्यांदाच ३ लाखापेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहे

दिल्ली : देशात बुधवारी (काल) ३ लाख १४ हजार ८३५ कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर त्या २४ तासात देशात २ हजार १०४ कोरोना बाधितांचां मृत्यू झाला आहे. तर १ लाख ७८ हजार ८४१ जण कोरोना बाधित उपचारा नंतर बरे झाले आहेत.
देशात आता पर्यंत ऐकून कोरोना बाधितांची संख्या १ कोटी ५९ लाख ३० हजार ९६५ वर पोहचली आहे. तर देशात आता पर्यंत १ लाख ८४ हजार ६५७ जणांनी आपले प्राण कोरोना मुळे गमावले आहे. सध्या देशभरात २२ लाख ९१ हजार ४२८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिलेल्या माहिती नुसार देशात आता पर्यंत २७ कोटी २७ लाख ५ हजार ३०१ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. तर बुधवारी १६ लाख ५१ हजार ७११ नमुन्याची चाचणी करण्यात आली आहे.
तसेच दिल्ली मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे नेते सीताराम येचुरी यांच्या ३४ वर्षीय मुलाचे कोरोनाने मृत्यू झाला गेल्या २ आठवड्यापासून त्याच्यावर उपचार सुरू होते.