लोकगायिकी मैथिली ठाकुर हिने घेतली या शिवसेना नेत्याची भेट
दिल्ली: आपल्या आवाजाने संपूर्ण भारताला भुरळ घालणाऱ्या लोकगायिका मैथिली ठाकूर हिने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या दिल्लीतील घरी जाऊन भेट घेतली. तसेच २४ मार्च रोजी मराठी गीतांचा कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती मैथिली हिने फेसबुक लाईव्ह येवून दिली. यावेळी मैथिली सोबत संजय राऊत सुद्धा उपस्थित होते.
मैथिली ठाकूर हीचा मोठा चाहता वर्ग आहे. हिंदी बरोबरच इतर भाषेतील तिने गायलेली गाणी प्रसिद्ध आहेत. सोशल मीडियावर तिला अनेक दिग्गज फॉलो करतात.
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी २४ मार्च रोजी मराठी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मैथिली ही पहिल्यांदा मराठी गाणे गाणार आहे. त्याबद्दल तिने आनंद व्यक्त केला.
कार्यक्रमाबद्दल माहिती देताना मैथिली म्हणाली, २४ मार्च रोजी होणाऱ्या कार्यक्रमाबाबत मी फार उत्सुक असल्याचे सांगत, जेव्हा मला पहिल्यांदा खासदार संजय राऊत यांनी फोन केला तेव्हा मला विश्वासच बसला नाही. की आपण संजय राऊत यांच्याशी बोलत आहोत.
तसेच खासदार संजय राऊत यांनी मैथिलीचे गाणे रोज ऐकत असल्याचे सांगितले. मी मैथिलीच्या गाण्याचा मोठा फॅन आहे. माझ्या बरोबरच माझ्या कुटुंबातील सदस्य सुद्धा मैथिलीचा फॅन असल्याचे राऊत यांनी सांगितले .
२४ मार्च ला होणाऱ्या मराठी गीतांचा कार्यक्रमा बाबत आपणही उस्तुक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा मैथिलीचे गाणे आवडतात असेही संजय राऊत यांनी सांगितले.
मैथिली ही मूळची बिहारची आहे. तिच्या सोबत २ लहान भाऊ आणि बहीण हे गाण्याला साथ देतात. तिला फेसबुकवर ९ लाखापेक्षा जास्त फॉलोवर आहेत. ट्विटरवर १२ लाख फॉलोवर आहेत.