Tuesday, October 4, 2022
Homeसंसदेच्या गॅलरीतूनG -23 गटातील पहिला राजीनामा ; आता गांधींना 'कॉंग्रेस जोडो अभियान' गरजेचे

G -23 गटातील पहिला राजीनामा ; आता गांधींना ‘कॉंग्रेस जोडो अभियान’ गरजेचे

कॉंग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. कॉंग्रेसचे दिग्गज नेते गुलाम नबी आझाद यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांपासून ते राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर नाराज होते. दरम्यान, त्यांनी आज सोनिया गांधी यांना पत्र लिहित कॉंग्रेसमधील नेत्यांसह राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.

कॉंग्रेसच्या माध्यमातून ते जम्मू काश्मीरचे प्रतिनिधित्व केले. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे. मात्र, आज त्यांनी कॉंग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे.

गांधी घराण्याशी एकनिष्ठ मात्र राहुल गांधींवर टीका

वर्षानुवर्षे ते गांधी घराण्याशी एकनिष्ठ होते. इंदिरा, संजय, राजीव आणि सोनिया गांधी यांच्यासोबत त्यांनी कॉंग्रेसच्या विस्तारात आपले योगदान दिले. गांधींच्या अत्यंत निकटवर्तीय असणार्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता.

मात्र, राहुल गांधी हे अनुभवहिन नेत्यांच्या गराड्यात अडकल्याची टीका करत गुलाम नबी आझाद यांनी धक्कादायक निर्णय घेत्याचे पाहायला मिळत आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील कॉंग्रेसमध्ये चर्चेची परंपरा संपली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

राहुल गांधींनी पक्षातील विचार विनिमयाची यंत्रणा संपवली. अनुभवी नेत्यांना बाजूला केले. अध्यादेश फाडण्याची कृती अत्यंत ‘बालिश’ होती. पक्षाचे निर्णय राहुल गांधीचे PA आणि कधी कधी तर चक्क सुरक्षा रक्षक घेतात, अशी टीका गुलाम नबी आझाद यांनी केली.

आगामी भूमिका

पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंजाब कॉंग्रेसमध्ये मोठी उलाथापालथ झाली. नवज्योत सिंह सिद्धू यांना ताकद देत मुख्यमंत्री बदलामुळे कॉंग्रेसमध्ये उभी फुट पडली. हायकमांडच्या आदेशानुसार, अमरिंदर सिंह यांनी मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडलीच ; शिवाय कॉंग्रेसलाही राम राम करून नवीन पक्ष स्थापन केला.

पंजाब विधानसभा निवडणुकीत अमरिंदर सिंह यांनी भाजपसोबत युती करून निवडणूक लढवली. ज्यामुळे कॉंग्रेसला मोठा फटका बसला.

जम्मू-काश्मीरमध्ये या वर्षी विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. तशा हालचाली सुरू आहेत. अशातच आझाद यांनी कॉंग्रेसमधूल बाहेर पडल्याने ते देखील अमरिंदर सिंह यांच्या वाटेवर जाऊ शकतात. आझाद यांच्या कॉंग्रेस सोडण्याने जम्मू काश्मीरचे विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे नुकसान होईल, अशी चिन्हे आहेत.

कारकीर्द

1980 पासून संसदीय राजकारणात असलेल्या गुलाम नबी आझाद यांची केंद्रीय मंत्री, जम्मूचे मुख्यमंत्री ते राज्यसभा विरोधीपक्ष नेते अशी कारकीर्द राहिलेली आहे.

संघटनात्मक पातळीवर आझाद यांनी आपली छाप सोडलेली आहे. 1973 मध्ये भालेसा येथील ब्लॉक काँग्रेस कमिटीचे सचिव म्हणून त्यांनी कॉंग्रेसचे काम सुरु केले होते. पुढे त्यांनी जम्मू आणि काश्मीर प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम पहिले.

1980 मध्ये अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. या माध्यामतून त्यांना राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळाली.

G -23

ठिकठिकाणी होणारे पराभव व पक्षाला लागलेली गळती यातून कॉंग्रेस पक्षाला उभारी मिळत नसल्याने पक्ष सावरण्यात अपयशी ठरला ठरल्याच्या मुद्द्यावर कॉंग्रेसमधील जेष्ठ नेत्यांनी बोट ठेवले होते.

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या गटाने ऑगस्ट 2020 मध्ये पक्षाच्या हंगामी प्रमुख सोनिया गांधी यांना सर्वप्रथम पत्र लिहिले होते. या 23 नेत्यांच्या गटाने संघटनात्मक पातळीवरील बदलांची मागणी केली होती.

तात्काळ संघटनात्मक फेरबदलासोबतच नेत्यांनी सक्रिय नेतृत्वाचीही मागणी पत्रात नमूद केली होती. या २३ नेत्यांच्या गटात गुलाम नबी आझाद यांचाही समावेश आहे. आझाद यांनी राजीनामा दिल्यावर तरी या मागण्यांबाबत गांधी परिवार काही विचार करणार का ? याकडे लक्ष लागले होते.

कॉंग्रेस जोडो अभियान गरजेचे

एकीकडे संघटनात्मक पातळीवर मजबुतीकरणासाठी कॉंग्रेसकडून भारत जोडो आंदोलनाची तयारी सुरू असतानाच गुलाम नबी आझाद यांच्या निर्णयामुळे सोनिया, राहुल गांधींना कॉंग्रेस जोडो मोहीम राबवावी लागणार आहे.

अधिक वाचा :

सरकारविरोधी संघर्षात सातत्याचा अभाव, प्रियंका ११ महिन्यांनी रस्त्यावर अवतरल्या!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments