|

मतदानाचा पहिला टप्पा: बंगालमध्ये ७९. ८ टक्के,आसाममध्ये ७२.१ टक्के मतदान

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

पश्चिम बंगाल: पश्चिम बंगाल आणि आसाममधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यातील मतदानात बंगालमध्ये ७९. ८ टक्के आणि आसाममध्ये ७२.१ टक्के मतदान झाले. दोन्ही राज्यात मतदानाची प्रक्रिया सकाळी ७ वाजता सुरू झाली.

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात, कडक सुरक्षेत ३० जागांसाठी आज मतदान झाले. यातील जास्तीत जास्त जागा नक्षलग्रस्त भागात आहेत. त्यामुळे या भागात सुरक्षेची कडक व्यवस्था करण्यात आली होती. २०१९ साली झालेल्या या भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला चांगले यश मिळालं होते. 

याचबरोबर, आसाममधील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील ४७ जागांसाठी मतदान सकाळी सात वाजता सुरू झाले, या टप्प्यात मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, मंत्री आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांचं भवितव्य ठरेल. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आणि कडक सुरक्षेत मतदान घेण्यात आलं. निवडणूक आयोगाने ७,०६१ भागात १०,२८८ मतदान केंद्रांचे संरक्षण करण्यासाठी केंद्रीय दलाच्या सुमारे ७३० तुकड्या तैनात केल्या होत्या.

मतदान सुरू होण्यापूर्वीच अनेक मतदान केंद्रांच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

पहिल्या टप्प्यात आसाममधील एकूण ८१,०९,८१५ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावू शकतील. यात ४०,७७,२१० पुरुष ४०,३२,४८१ महिला असून नऊ परदेशी मतदारांव्यतिरिक्त १२ तृतीय पंथी मतदार आहेत. सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान सुरू राहील.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *